- ऋजुता लुकतुके
एफएमसीजी म्हणजेच फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गूड्स किंवा ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांची बाजारपेठ मोठी आहे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, विविध पेयं, शीतपेयं तसंच आपल्याला रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या वस्तू या कंपन्या बनवतात. देशाच्या जीडीपीमध्येही या क्षेत्राचं योगदान मोठं आहे. या वस्तू लोकांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या असल्यामुळे मंदीच्या काळातही त्यांची गरज लागते. त्यामुळे मंदीतही उत्पादन प्रक्रिया सुरूच राहून आर्थिक चक्र सुरू राहतं. त्यासाठी या कंपन्या महत्त्वाच्या आहेत. (FMCG Companies)
रोजच्या जीवनात लागणाऱ्या आणि नाशिवंत तसंच संपणाऱ्या असल्यामुळे त्यांची मागणी सततची आहे. पण, त्याचबरोबर या कंपन्यांमधील स्पर्धाही मोठी आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर ही भारतातील सगळ्यात पहिली आणि मोठी एफएमसीजी कंपनी आहे. देशातील पहिल्या पाच एफएमसीजी कंपन्या आणि त्यांची उत्पादनं पाहूया,
(हेही वाचा – Assembly Elections 2024 : बंडोबांना केले जाईल थंड की मैत्रीपूर्ण या गोंडस नावाखाली सर्वकाही सामावून जाईल ?)
१. हिंदुस्थान युनिलिव्हर – हिंदुस्थान युनिलिव्हर ही भारतातील सगळ्यात जुनी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. १९३३ मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. अगदी जुन्या लाईफ बॉय साबण आणि ब्रूकबाँड चहापासून या कंपनीचा प्रवास सुरू झाला आहे तो आता लक्स, क्लोजअप, क्लिनिक प्लस, डव्ह, हॉरलिक्स, क्वालिटी वॉल्स, पाँड्स या उत्पादनांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीची ५० च्या वर उत्पादनं सध्या बाजारात आहेत. कंपनीचं भारतीय शेअर बाजारातील भाग भांडवल ६.६७ लाख कोटी रुपयांच्या वर आहे.
२. आयटीसी – आयटीसी हा कंपनी ही खाद्यपदार्थ, तेलं, साबण, चहा यांच्यापासून ते हॉटेल व्यवसाय, पॅकेजिंग आणि कृषि उत्पादनांमध्येही कंपनी अग्रेसर आहे. ही कंपनी आता रिटेल उद्योगांवरही लक्ष केंद्रित करत आहे. २०२४ मध्ये कंपनीने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. आणि त्यानुसार आपल्या ५० टक्के उत्पादन प्रक्रियेसाठी कंपनी अक्षय्य ऊर्जा वापरते. आणि पर्यावरणपूरक साधनांचा वापर करते. सनफिस्ट बिस्किटं, आशीर्वाद आटा, मिठाई, बिंगो वेफर्स, नॅचरल ज्यूसेस, फियामा साबण, याशिवाय स्टेशनरी सामानही कंपनी बनवते. कंपनीचं भारतीय शेअर बाजारातील भाग भांडवल ६.४ लाख कोटी रुपये इतकी आहे. (FMCG Companies)
(हेही वाचा – Telangana : मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू, 15 जण आजारी)
३. नेस्ले – नेस्ले ही भारतातील तिसरी मोठी एफएमसीजी कंपनी आहे. किटकॅट चॉकलेट, नेसकॉफी, आईसक्रीम आणि इतर उत्पादनं विशेष प्रसिद्ध आहेत. १९६१ मध्ये भारतात आलेली ही कंपनी इथली सगळ्यात जुनी कॉफी उत्पादन आणि प्रक्रिया कऱणारी खाजगी कंपनी आहे. ग्रामीण भारतातील लोकांना हाताशी धरून तिथले घटक वापरून कंपनीने आपला विस्तार देशभरात केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी ही कंपनी जोडली गेली आहे. कंपनीचं भारतीय शेअर बाजारातील भांग बांडवल २.५ लाख कोटी रुपये इतकं आहे.
४. ब्रिटानिया – ब्रिटानिया ही देशातील आणखी एक स्वातंत्र्यपूर्व काळातील कंपनी आहे. १९१८ मध्ये तिची स्थापना झाली आहे. बेकरी व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनामध्ये कंपनीचा हातखंडा आहे. टायगर बिस्किट, गुडडे बिस्किट न्यूट्री चॉईस ही कंपनीची मुख्य उत्पादनं आहेत. कंपनीने मागच्या काही वर्षांत आपल्या उत्पादनांमध्ये प्लास्टिकचा शून्य वापर करण्याचं धोरण ठेवलं आहे. त्या बाबतीत ते १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचं भाग भांडवल १.४७ लाख कोटी रुपये इतकं आहे. (FMCG Companies)
(हेही वाचा – OnePlus 13 : वनप्लस १३ मालिका चीनमध्ये लवकरच होणार लाँच, भारताविषयी उत्सुकता)
५. वरुण बेव्हरेजिस – वरुण बेव्हरेजेस ही कंपनी भारतात पेप्सी या शीतपेयं बनवणाऱ्या कंपनीबरोबरच पुढे आली. कारण, १९९५ ला स्थापन झालेल्या या कंपनीचा मुख्य ग्राहक आहे पेप्सिको. त्यांच्यासाठी शीतपेयं बाटलीबंद करण्याचं काम ही कंपनी करते. ती या घडीला भारतातील पाचवी मोठी एफएमसीजी कंपनी आहे. पेप्सी, मिरिंडा, गेटोरेड ही शीतपेयं तसंच लेज, डोरिटोज, कुरकुरे ही त्यांची उत्पादनं आहेत. कंपनीचं भाग भांडवल १.७७ लाख कोटी रुपये इतकं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community