Godrej Real Estate : गोदरेज प्रॉपर्टीजच्या सीईओंना किती पगार मिळतो?

Godrej Real Estate : गोदरेज प्रॉपर्टीजचे सीईओ काय काम करतात?

76
Godrej Real Estate : गोदरेज प्रॉपर्टीजच्या सीईओंना किती पगार मिळतो?
  • ऋजुता लुकतुके

गोदरेज कुटुंबीय हे देशातील आघाडीचं उद्योजकांचं घराणं आहे. आदेशीर गोदरेज यांनी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन केलेल्या या समुहात आता एफएमसीजी, रिअल इस्टेट, फर्निचर उत्पादन, रसायनं, यंत्र अशी उत्पादनं बनवली जातात. १८९७ मध्ये स्थापना झालेल्या या समुहात गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर गुड्स, गोदरेज ॲग्रोवेट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज केमिकल्स या मुख्य कंपन्या आहेत. यापैकी गोदरेज प्रॉपर्टीज या कंपनीची सुरुवात झाली ती १९९० साली. (Godrej Real Estate)

(हेही वाचा – Cemeteries : मुंबईतील ९ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न; कमीत कमी लाकडांमध्ये होणार अंत्यसंस्कार)

मुंबईत मुख्यालय असलेली ही कंपनी आदी गोदरेज यांनी सुरू केली. पिरोजशाह गोदरेज हे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. तर नादिर गोदरेज हे संचालकीय मंडळातील एक मुख्य सदस्य आहेत. यांच्याशिवाय या मंडळातील इतर सदस्य हे गोदरेज कुटुंबीयांच्या बाहेरचे आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गौरव पांडे. बांधकाम व्यवसायाचा १७ वर्षांचा अनुभव असलेले गौरव पांडे यापूर्वी गोदरेज कंपनीत उत्तर विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. एनडीटीव्ही प्रॉफिटवरील द प्रॉपर्टी शोचे ते सादरकर्ते होते. (Godrej Real Estate)

(हेही वाचा – FMCG Companies : या आहेत देशातील ५ अव्वल एफएमसीजी कंपन्या)

गेली १ वर्षं ८ महिने ते गोदरेज प्रॉपर्टीजचे सीईओ म्हणून काम पाहत आहेत. या पदावर काम करताना आतापर्यंत कंपनीचे ०.००२ टक्के शेअरही त्यांच्या नावावर आहेत. तर कंपनीकडून वार्षिक मोबदला म्हणून त्यांना १४२.१ दशलक्ष रुपये इतके पैसे वर्षाला मिळतात. या हिशोबाने त्यांचा मासिक पगार महिन्याला २२.४ दशलक्ष रुपये इतका आहे. कंपनीने अगदी अलीकडे सादर केलेल्या तिमाही ताळेबंदात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशाह गोदरेज यांना वार्षिक २२३.४० दशलक्ष रुपये इतका सर्वाधिक मोबदला मिळतो. (Godrej Real Estate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.