- ऋजुता लुकतुके
पोलीस उपमहानिरीक्षक हा महानिरीक्षकाच्या हाताखाली थेट काम करतो. अखत्यारीत येणाऱ्या भागात गुन्हे घडू नयेत यासाठीची उपाययोजना, पोलीस ठाण्यांची कार्यपद्धती आणि गुन्ह्यांचा तपास या बाबतीत ही व्यक्ती अत्यंत जबाबदारीच्या पदावर आहे. खासकरून विभागात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी ही उपमहानिरीक्षकावर असते. तसंच सणवार, राजकीय भाषणं अशावेळी मोठा जमाव एकत्र येत असताना तिची नियोजन पार पाडण्याचं काम लोकांमध्ये उतरून या व्यक्तीला करावं लागतं. (Deputy Superintendent of Police Salary)
(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi यांचं छत्तीसगडवासीयांना मोठं गिफ्ट! ‘या’ प्रकल्पांना देणार भेट )
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच तुम्हाला उपमहानिरीक्षक होता येतं. त्यासाठी एक लेखी परीक्षा, शारीरिक कस तपासणारी परीक्षा आणि पुढे वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत असं परिक्षेचं स्वरुप असतं. जमावाबरोबर काम करत असल्यामुळे उपमहानिरीक्षकाला पोलीस आणि जनतेमधील दुवा समजलं जातं. त्यासाठी अशा अधिकाऱ्याकडे संवाद कौशल्यही आवश्यक आहे. (Deputy Superintendent of Police Salary)
(हेही वाचा –Godrej Real Estate : गोदरेज प्रॉपर्टीजच्या सीईओंना किती पगार मिळतो? )
वरिष्ठ सनदी अधिकारी असल्यामुळे सरकारी वेतन आयोगानुसार उपमहानिरीक्षकाचा पगार ठरवला जातो. तसंच सेवा ज्येष्ठतेनुसार त्यात वाढ होत जाते. पण, सातव्या वेतन आयोगानुसार, सध्या महाराष्ट्रातील उपमहानिरीक्षकाचा सरासरी पगार हा १,१९,८६४ रुपये इतका आहे. (Deputy Superintendent of Police Salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community