- ऋजुता लुकतुके
अमेरिकेतही सध्या अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप विरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यातला मुकाबला खूपच कडवट वळणं घेत आहे. चित्र इतकं धूसर आहे की, राजकीय वातावरणाचा फटका देशातील आर्थिक आणि सामाजिक मुद्यांनाही बसतो आहे. ताजं उदाहरण म्हणजे लॉस एंजलिस टाईम्स पाठोपाठ द वॉशिंग्टन पोस्टनेही या राजकीय लढाईत कुणा एकाची बाजू घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कुणा एका अध्यक्षीय उमेदवाराची बाजू न घेण्याचा त्यांचा पवित्रा आहे. पण, ही भूमिका वॉशिंग्टन पोस्टचे मालक जेफ बेझॉस यांनी आर्थिक हितसंबंध बघून घेतल्याचा आरोप होतोय. त्यामुळेच देशातील तिसऱ्या मोठ्या वृत्तपत्राने बोटचेपी भूमिका घेतलेली अनेकांना आवडली नाहीए. शनिवारी वर्तमानपत्राने ही भूमिका जाहीर केल्यानंतर तीन दिवसांत त्यांचे २ लाखांहून जास्त वर्गणीदार त्यांना सोडून गेले आहेत. (US Presidential Election)
(हेही वाचा – दर महिन्याला ३ हजार हिंदूंचे Conversion; कैलवरी चर्चचे षडयंत्र उघड)
द वॉशिंग्टन पोस्ट हे पारंपरिकदृष्ट्या डेमोक्रॅटिक विचारसरणीचं वृत्तपत्र आहे. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक उमेदवाराची बाजू घेतलेली आहे. पण, यंदा वर्तमानपत्राच्या संपादकीय मंडळाने कमला हॅरिस यांच्याच बाजूने वर्तमानपत्राची भूमिका जाहीर करायची असा ठराव मांडलेला असताना मालक जेफ बेझोस यांनी अचानक निरपेक्षतेचा मुद्दा उचलून धरत कुणाच्या बाजूने उभं राहणार नाही, अशी नेमस्त भूमिका जाहीर करायला लावली. जेफ बेझॉस हे अमेरिकेतील मोठे उद्योजक आहेत आणि ॲमेझॉन ही एक मोठी ई-कॉमर्स वेबसाईट ते चालवतात. उद्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले तर त्यामुळे ॲमेझॉन आणि आपल्या एकूणच औद्योगिक साम्राज्याचं नुकसान होईल, या भीतीने बेझॉस यांनी कुठलीही भूमिका घेण्यापासून आपल्या कर्मचाऱ्यांना रोखल्याचं आता बोललं जातंय. (US Presidential Election)
(हेही वाचा – आर आर आबांनी माझी चौकशी करण्यासाठी सही केली; केसाने गळा कापला; Ajit Pawar यांचा गौप्यस्फोट)
आणि त्याचे पडसाद वर्गणीदारांमध्ये उमटले आहेत. संपादकीय मंडळातील दोन ज्येष्ठ संपादकांनीही यावरून राजीनामा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी ट्रंप निवडून आल्यावर त्यांनी आपल्या विरोधात भूमिका घेणाऱ्या द वॉशिंग्टन पोस्टवर जाहीर टीका केली होती. आणि त्याचा परिणाम म्हणून वर्तमानपत्राचं आर्थिक नुकसानही झालं होतं. याच गोष्टीला घाबरून नवीन मालक जेफ बेझॉस यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. द वॉशिंग्टन पोस्ट हे न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉलस्ट्रिट जर्नल यांच्या खालोखाल तिसऱ्या खपाचं वर्तमानपत्र आहे. गेल्या आठवड्यात त्याचे २५ लाख वर्गणीदार होते. आता अचानक दोन लाखांनी ही संख्या खाली आली आहे. (US Presidential Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community