- ऋजुता लुकतुके
नवी दिल्लीचा युवा तेज गोलंदाज हर्षित राणाची बोर्डर-गावस्कर चषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिथे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीबरोबर तो भारतीय संघात असणार आहे. हीच गोष्ट हर्षितला सुखावते. इतकंच नाही तर नेट्समध्ये विराटला गोलंदाजी करता येईल या कल्पनेनंच तो खुश आहे. यापूर्वीचा विराट कोहलीबरोबरचा अनुभव सगळ्यात चांगला असल्याचं त्याने म्हटलं आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा – दर महिन्याला ३ हजार हिंदूंचे Conversion; कैलवरी चर्चचे षडयंत्र उघड)
‘मला विराट आणि रोहित, दोघांनाही नेट्समध्ये गोलंदाजी करायला आवडतं. दोघं सामन्यात ज्या तन्मयतेनं खेळतील, तितक्याच गंभीरपणे नेट्समध्येही गोलंदाजी करतात. त्यामुळे आपल्यालाही चूक करून चालत नाही. भारतीय संघात निवड झाल्यावर मी विराट भाईशी खासकरून बोललोय. त्याने मला चेंडूच्या टप्प्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. तेच मी करणार आहे. विराट खेरिज मी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजशीही बोललो आहे,’ असं हर्षित राणाने मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा – Shooting Championship : प्रज्ञा केसरकरने 11व्या पश्चिम क्षेत्र नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत जिंकली ३ सुवर्ण, तर १ रौप्य)
हर्षितने अलीकडेच रणजी करंडकात दिल्लीकडून खेळताना आसाम विरुद्ध ५ बळी मिळवले आहेत. तो भारतीय संघाबरोबर राखीव खेळाडू म्हणूनही होता. तेव्हाही त्याने जसप्रीत बुमराह आणि सिराजशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चर्चा केली आहे. ‘मला ऑस्ट्रेलियात गोलंदाजी करावी लागली तर नेमकं काय तंत्र वापरायला हवं यावर मी दोघांशी चर्चा केली आहे. मी त्यांना सतत प्रश्न विचारत होतो आणि ते दोघंही मला उत्तरं देत होते,’ असं हर्षितने सांगितलं. हर्षितसह यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल, नितिश रेड्डी, अभिमन्यू ईश्वरन यांचाही हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. हा दौरा भारतीय संघासाठीही कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community