Bhandup मधील शिवसेना उबाठाच्या भोंग्याचे ध्वनिप्रदूषण Congress ने केले कमी!

164
Bhandup मधील शिवसेना उबाठाच्या भोंग्याचे ध्वनिप्रदूषण Congress ने केले कमी!
  • खास प्रतिनिधी 

काँग्रेसने (Congress) शिवसेना उबाठाकडून दररोज सकाळी मुंबईतील भांडुप परिसरात होणारे ध्वनिप्रदूषण पातळी बऱ्यापैकी खाली आणली आहे.

हायकमांडशी थेट बोलण्याची धमकी

भांडुपच्या मैत्री बंगल्यात दररोज सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेतात. मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटापावेळी शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत वेळोवेळी राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांना दिल्लीतील हायकमांडशी थेट बोलण्याची धमकी देत असत आणि दिल्ली हायकमांडदेखील राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेत असत.

(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi यांचं छत्तीसगडवासीयांना मोठं गिफ्ट! ‘या’ प्रकल्पांना देणार भेट )

टोकाची भूमिका

हीच पद्धत राऊत यांनी विधानसभा निवडणूक जागावाटप चर्चेतही अवलंबली. सुरुवातीला काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करणारे राऊत गेल्या ८-१० दिवसांपूर्वी पुन्हा त्याच ‘मोड’मध्ये गेले आणि राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांना तुच्छ समजत थेट काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी बोलू अशी धमकी दिली. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीला असतील तर शिवसेना ऊबाठा महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली.

..आणि फटक्याचा आवाज कमी झाला

त्यानंतर शिवसेना उबाठाने थेट काँग्रेस (Congress) हायकमांडशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र गांधी यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याचप्रमाणे राज्यातील जागावाटपाबाबत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांशीच बोलावे लागेल, असा निरोप त्यांना आला आणि उबाठाच्या सकाळच्या ‘फटक्याचा आवाज’ आपोपापच दिवाळीपूर्वी कमी झाला. आता तर अशी परिस्थिती आहे की काँग्रेस देतील तितक्या जागा उबाठाने घ्याव्या, अन्यथा वेगळा मार्ग निवडावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याने उबाठाने काँग्रेसविरोध कमी केला आहे.

(हेही वाचा – Ayushman bharat yojana मंगळवारपासून सर्व ज्येष्ठांना लागू होणार)

पटोले-थोरातांशी चर्चा सुरू

मंगळवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस (Congress) हायकमांडचे नावही न घेता, “आमची नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी व्यवस्थित चर्चा सुरू आहे,” असे स्पष्ट केले. यामुळे काँग्रेसने सकाळच्या भोंग्याचा आवाज कमी करत मुंबईतील ध्वनिप्रदूषणाची पातळी खाली आणली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.