राष्ट्रवादी अजित पवार गटाने नवाब मलिक (Nawab Malik) यांना मानखुर्द येथून उमेदवारी दिल्यानंतर भाजपामध्ये नाराजी पसरली आहे. आता त्यांच्या विरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांनी विरोध दर्शवला आहे. निवडणूक प्रचारात नवाब मलिक यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय सोमेय्या यांनी जाहीर केला आहे.
(हेही वाचा आर आर आबांनी माझी चौकशी करण्यासाठी सही केली; केसाने गळा कापला; Ajit Pawar यांचा गौप्यस्फोट)
सोमैया सुरेश पाटील यांना पाठिंबा देणार
नवाब मलिक (Nawab Malik) यांना उमेदवारी देण्यावरून भाजपामध्ये तीव्र नाराजी होती. त्यासंदर्भात दिल्लीतही बैठक झाली होती. पण, अजित पवारांनी भाजपाचा विरोध झुगारून देत मलिकांना उमेदवारी दिली आहे. नवाब मलिकांनी मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपण्याच्या काही मिनिटे आधी एबी फॉर्म जमा केला. शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही सुरेश (बुलेट) पाटील यांना उमेदवारी दिली आहेत. त्यामुळे मित्रपक्षांचेच उमेदवार आमने सामने आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमैयांनी विरोध केला आहे. भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टॅग करत किरीट सोमय्यांनी एक पोस्ट केली आहे. सोमय्यांनी म्हटलं आहे की, शिवाजीनगर मानखुर्दचे महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार बुलेट पाटील हे आहेत. व्होट जिहाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आम्ही लढू, असा थेट इशारा सोमय्यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community