Assembly Election : महायुती आणि मविआला बंडखोर नेत्यांचं टेन्शन, नेत्यांची दिवाळी जाणार समजूत काढण्यात

93
Maharashtra Assembly Election : सलग ७ ते ८ वेळा निवडून येणाऱ्या दिग्गजांनाही यंदाची निवडणूक सोपी नाही
  • प्रतिनिधी

महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर बंडखोरी करणाऱ्या नेत्यांचं चांगलंच टेन्शन आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्याकडून जागा वाटप जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी तिकीट न मिळालेल्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल केली. (Assembly Election)

(हेही वाचा – Ayushman bharat yojana मंगळवारपासून सर्व ज्येष्ठांना लागू होणार)

तीन प्रमुख पक्षांची तसेच छोट्या मित्र पक्षांची महायुती त्याचबरोबर तीन महत्त्वपूर्ण पक्षांची आणि त्यांच्या मित्र पक्षांची महाविकास आघाडी एकमेकांसमोर जरी लढत असेल तरी इच्छुक मात्र अधिक होते. त्यामुळे विधानसभा निवडणुका अत्यंत रंगतदार झाल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या बैठका घेऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही शेवटपर्यंत सुटू शकला नाही. त्यामुळेच महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोन्हीकडून इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Diwali 2024 : दिवाळीत हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी करू नका; हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आवाहन)

आज २९ ऑक्टोबर विधानसभा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ४ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या दरम्यान सर्वात मोठा सण दिवाळी येणार आहे. असे असले तरी सर्वच पक्षांचे नेते मात्र बंडोबांना थंडोबा करण्यात व्यस्त असणार आहेत. यंदाच्या दिवाळीमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडे एकच महत्त्वाचे काम टार्गेट म्हणून केले जाणार आहे ते म्हणजे बंडखोरांना थंड करून उमेदवारी मागे घेण्यास लावणे. महायुती मधून काही नेत्यांवरती बंडखोरांची नाराजगी दूर करत चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तशाच प्रकारे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांकडे त्यांच्या नाराजांना समजावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळेच या नेत्यांची दिवाळी कुटुंबीयांसोबत नसून तर बंडखोरांच्या घरी जाऊन नाराजी दूर करण्यातच जाणार आहे. कोणत्या बंडखोराला कोणती मिठाई आवडते हे समजून जो नेता योग्य मिठाई देईल तोच बंडखोर आपली उमेदवारी मागे घेईल. कुणाला कोणती मिठाई लागू झाली याचा निकाल मात्र येणाऱ्या चार तारखेलाच कळू शकेल. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.