Maharashtra Assembly Election 2024 : २८८ जागांसाठी १०९०५ अर्ज; ७९९५ उमेदवार रिंगणात

45
Maharashtra Assembly Election 2024 : २८८ जागांसाठी १०९०५ अर्ज; ७९९५ उमेदवार रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024 : २८८ जागांसाठी १०९०५ अर्ज; ७९९५ उमेदवार रिंगणात

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. २८८ मतदारसंघासाठी राज्यात ७९९५ उमेदवारांनी १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – मनी लाँड्रिंग प्रकरणी Fair Play वेबसाईटच्या कार्यालयावर ईडीचे छापे )

२९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, माकप, महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान पार्टी,जनसुराज्य शक्ती पार्टी हे रिंगणात आहेत. या शिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात विधानसभेसाठी मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे २९ ऑक्टोबरपर्यंत सादर झालेल्या अर्जांची संख्या निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.