Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात “या” विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारी अर्ज

Maharashtra Assembly Election 2024 : शेवटच्या दिवशी तब्बल १४४ अर्ज दाखल

107
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात सर्वात जास्त ५१५ इच्छुकांचे ६६७ अर्ज दाखल
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात सर्वात जास्त ५१५ इच्छुकांचे ६६७ अर्ज दाखल
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या  उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. राज्यभरात उमेदवारी अर्ज दाखल करताना २८८ जागांसाठी तब्बल १० हजार ९०५ अर्ज भरत ७९९५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये राज्यातील दोन महत्त्वपूर्ण पक्षांची दोन शकले पडले आहेत. त्यानंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये राज्यातील तीन महत्त्वपूर्ण पक्ष शिवसेना शिंदे गट, भाजपा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर छोट्या पक्षांची मिळून महायुती तयार झाली आहे. तर विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी असा दुसरा गट आहे. याबरोबरच राज्यात तिसरी आघाडी देखील तयार झाली आहे.  (Maharashtra Assembly Election 2024)
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारी अर्ज ज्या मतदारसंघातून करण्यात आले आहेत त्या मतदारसंघाचे नाव आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर ची एक वेगळी ओळख आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एका दिवसात तब्बल १४४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भोकर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकूण १७६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.(Maharashtra Assembly Election 2024)
भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री, भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख राहलीय. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी याठिकाणाहून एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त मत घेतली होती. तर २०१४ साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांचा विजय झाला. मात्र मताधिक्यांमध्ये वीस हजाराने घडले. २०१९ साली अशोक चव्हाण यांनी निवडणुक लढवली होती. त्यावेळी त्यांना १ लाख ४० हजार मत घेतलीत.त्यांच्याविरोधातील भाजप उमेदवार श्रीनिवास गोरठेकर यांना अवधी ४३, ११४ मते मिळवली होती. (Maharashtra Assembly Election 2024)
राज्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात हा मतदारसंघ पहिला ठरला आहे. इतर कुठल्याही मतदारसंघात एवढे उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत. ३० ऑक्टोबरला या मतदारसंघात या उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.