Maharashtra Assembly Election 2024: मतदारांची ओळख पटविण्यासाठी ‘हे’ १२ पुरावे धरले जाणार ग्राह्य!

87
Maharashtra Assembly Election 2024: मतदारांची ओळख पटविण्यासाठी 'हे' १२ पुरावे धरले जाणार ग्राह्य!
Maharashtra Assembly Election 2024: मतदारांची ओळख पटविण्यासाठी 'हे' १२ पुरावे धरले जाणार ग्राह्य!

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या मतदानावेळी मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्राशिवाय इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

(हेही वाचा-Divorce News: सहमतीने घटस्फोट घेणाऱ्यांसाठी हायकोर्टाने कौटुंबिक न्यायालयांना दिल्या महत्त्वाच्या सूचना)

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) करिता जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकतात.

(हेही वाचा-Srinivas Vanaga ३६ तासांनंतर परतले; पण…)

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बैंक,पोस्ट ऑफिस यांनी जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र-राज्य सरकार-सार्वजनिक उपक्रम-पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, आमदारांना दारांना देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र हे पुरावे सादर करता येऊ शकतील. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.