Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून मतदारांची शोध मोहीम!

33
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून मतदारांची शोध मोहीम!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून मतदारांची शोध मोहीम!

वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घरून मतदान (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) करावे, यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. यासाठीच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत अत्यल्प यश मिळाल्याने आता इमारती-चाळीतील हुडकून काढण्याची मोहीम निवडणूक आयोगाने (Election Commission) सुरू केली आहे. यामुळेच आता अंगणवाडी सेविकांना शोध मोहिमेदरम्यान ‘आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत?’ असा प्रश्न विचारावा लागत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: मतदारांची ओळख पटविण्यासाठी ‘हे’ १२ पुरावे धरले जाणार ग्राह्य!)

निवडणूक आयोगाने (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली. त्यावेळी ज्यांचे वय ६० ते ६५ वर्षे होते, अशा व्यक्तींच्या नावाची यादी अंगणवाडी सेविकांना दिली आहे. त्यांनी वेगवेगळ्या विभागांत जाऊन ते मतदार त्याच पत्त्यावर वास्तव्यास असतील, तर त्यांचे घरून मतदानाचे अर्ज भरून घ्यायचे, असा द्राविडी प्राणायम आयोगाला करावा लागत आहे. ८५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना मतदान केंद्रावर येण्याचे कष्ट घ्यावे लागू नयेत, यासाठी अगोदर अर्ज भरावा लागतो. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात “या” विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारी अर्ज)

जिल्ह्यातील शहरांतील मंडळी नोकरी, व्यवसायात इतकी व्यस्त असतात की, असा अर्ज भरायला घरातील कुणीही तरुण व्यक्ती जात नाही. अशावेळी वयोमानानुसार आजोबांचे मत फुकट जाते. गंमतीचा भाग म्हणजे आयोगाने अंगणवाडी सेविकांना दिलेल्या यादीत अनेक नावांपुढे अंदाजे वय ८९, ९०, ९६ असे लिहिले आहे. प्रत्यक्षात काही आजोबांचे १५ ते २० वर्षापूर्वीच निधन झाले आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.