Ind vs NZ, 3rd Test : रोहित, विराट, जाडेजा आणि अश्विनची भारतातील ही अखेरची कसोटी आहे का?

भारतीय संघातील हे ज्येष्ठ खेळाडू सध्या फॉर्मसाठी चाचपडतायत

41
Ind vs NZ, 3rd Test : रोहित, विराट, जाडेजा आणि अश्विनची भारतातील ही अखेरची कसोटी आहे का?
Ind vs NZ, 3rd Test : रोहित, विराट, जाडेजा आणि अश्विनची भारतातील ही अखेरची कसोटी आहे का?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे भारतीय संघातील पचतिशी ओलांडलेले पण, अनुभवी क्रिकेटपटू आहेत. यापैकी विराट कोहली (Virat Kohli) तर आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मानला जातो. पण, सध्या यातील एकाही खेळाडूचा फॉर्म मनासारखा नाही. आणि परिणाम, भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरची मालिकाही गमावली आहे. भारतीय संघाने मागच्या १२ वर्षांत मायदेशात सलग १८ कसोटी मालिका जिंकल्या. आणि त्या जिंकून देण्यात याच खेळाडूंचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना दिग्गज खेळाडूंची उपमा मिळाली. पण, आता मागचे ४ ते ५ वर्ष या खेळाडूंनी मनासारखी कामगिरी केलेली नाही. म्हणूनच असा प्रश्न पडला आहे की, मुंबई कसोटी या चौघांसाठी मायदेशातील शेवटची कसोटी ठरेल का? (Ind vs NZ, 3rd Test)

एकतर त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. आणि तिथेच भारताच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीचा फैसला होईल. आणि संघ पात्र ठरला तरी ती कसोटी जूनमध्ये लॉर्ड्सवर होईल. म्हणजे पुढील एका वर्षासाठी भारतीय संघ मायदेशात कसोटी खेळणारच नाहीए. एका वर्षाने खेळेल तेव्हा हे चार खेळाडू संघात असतील का हाच प्रश्न आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल; Raj Thackeray यांचा विश्वास)

अश्विन सध्या ३८ वर्षांचा आहे. रोहित ३७ तर विराट आणि जाडेजा येत्या काही महिन्यात ३६ वर्षांचे होतील. पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. २०१२ मध्ये इंग्लिश संघाने भारताला भारतातच २-१ ने हरवलं होतं. त्यानंतर या भारताने मायदेशात ५५ कसोटी खेळल्या आहेत. त्यातील ४२ भारतीय संघाने जिंकल्या आहेत. तर फक्त ६ कसोटी गमावल्या आहेत. या ५५ कसोटींपैकी चौघंही जण खेळलेल्या कसोटी आहेत २२. आणि त्यात १७ कसोटींत भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कसोटी फलंदाजीला २०२० पासून उतरती कळा लागली आहे. आशियात फिरकीविरुद्ध त्याची सरासरी फक्त २८ धावांची आहे. ३३ कसोटींत त्याच्या नावावर फक्त १,८९३ धावा आहेत. रोहित शर्माचा (Rohit Sharma) कसोटीतील फॉर्मही अलीकडच्या काळात फारसा चांगला नाही. तो सलामीला येतो. फिरकीविरुद्ध त्याची सरासरी ३२ धावांची आहे. २०२२ पासून फक्त १२ वेळा तो ५० पेक्षा जास्त चेंडू खेळला आहे. एरवी तो झटपट बाद झाला आहे.

(हेही वाचा – West Bengal Crime: डॉक्टरांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन महिलेवर केले अत्याचार; अश्लील छायाचित्रेही काढली)

अश्विन त्याच्या पदार्पणापासून मायदेशातील प्रत्येक कसोटी खेळला आहे. त्यामुळे त्याच्यावर संघ प्रशासनाचा असलेला विश्वास यातून दिसतो. पण, न्यूझीलंड विरुद्ध त्याच्या गोलंदाजीतील एक कमजोरी उघड झाली आहे. किवी गोलंदाजांपेक्षा त्याचे चेंडू जास्त वळत असूनही चेंडूचा टप्पा कमालीचा गोंधळलेला आहे. आणि त्यात सातत्य नसल्यामुळे त्याला बळी मिळालेले नाहीत. त्याचा कसोटीवर प्रभाव जाणवलेला नाही. अश्विनने कारकीर्दीत षटकामागे फक्त २.८३ गतीने धावा दिल्या आहेत. पण, यंदा इंग्लंड, बांगलादेश आणि आता न्यूझीलंडने त्याच्या गोलंदाजीवर षटकामागे साडेतीन पेक्षा जास्त धावगतीने धावा लुटल्या आहेत.

अचूक गोलंदाजी आणि संघाला आवश्यक असताना मजबूत फलंदाजी ही रवींद्र जाडेजाची खासियत आहे. त्याची कारकीर्दीतील षटकामागे धावगती २.४३ इतकी कमी आहे. पण, आता तोही दिशा व टप्प्यात थोडा भरकटला आहे. पुण्यात कसोटीचे पहिले अडीच दिवस त्याला एकही बळी मिळाला नव्हता. तंदुरुस्तीच्या बाबतीत सध्या विराट आणि जाडेजा चौघांमध्ये सरस आहेत. आणि त्या निकषावर आणखी दोन वर्षं तरी खेळू शकतील. पण, रोहित आणि अश्विन त्या बाबतीही कमी पडणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.