मुख्यमंत्री बनायचे आहे का? काय म्हणाले Devendra Fadnavis?

85

मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

एका मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यामध्ये स्वारस्य आहे का, यावर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बोलणे टाळले. अशा चर्चा होतच असतात, त्याकडे लक्ष द्यायचे नसते, असेही ते म्हणाले. वकिली करण्याचे आपले स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले म्हणून मग आपण मागील २५ वर्षे विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.महायुतीमध्ये भाजपा सर्वात शक्तीशाली पक्ष आहे, त्यामुळे फडणवीस यांना डॅमेज करा म्हणजे महायुती कमजोर होईल असे मविआच्या थिंक टँकचे म्हणणे आहे, असा दावाही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

(हेही वाचा महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल; Raj Thackeray यांचा विश्वास)

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे की शरद पवार, कोणासाठी दरवाजे उघडणार?, असा प्रश्न विचारताच आम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. तशी परिस्थितीची येणारच नाही. 23 तारखेची वाट बघा, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.