तथाकथिक पर्यावरणप्रेमी, पुरोगामी आणि नास्तिकतावादी केवळ दिवाळी आली की फटाक्याने प्रदूषण होत असल्याची आवई उठवतात. हिंदूंची महाशिवरात्री आली की दूध वाया जात असल्याची टीका करतात; मात्र हे पुरोगामी बकरीईदच्या वेळेस रक्ताचे पाट वाहतात त्या वेळेस बोलत नाहीत; ख्रिसमस, 31 डिसेंबरला प्रदूषण होते त्या वेळी बोलत नाहीत; अन्य कार्यक्रमांच्या वेळी होणारे प्रदूषण वा अन्न-धान्याच्या नासाडी यांविषयी काही बोलत नाहीत. ही दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका का घेतली जाते ? केवळ हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणे आम्हाला मान्य नाही. दिवाळीच्या (Diwali) फटाक्यांनी प्रदूषण होते अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले वर्षभर कुठे असतात, असा थेट सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट (Sunil Ghanvat) यांनी केला आहे.
महाराष्ट्रात वर्षभर कोट्यवधी लिटर अतिदूषित पाणी आणि ८ हजार टन घनकचरा कुठलीही प्रक्रिया न करता सर्व महानगरपालिकांकडून नैसर्गिक जलस्त्रोतात सोडला जातो. त्या प्रदूषणाविषयी कोणी का बोलत नाही ? अनेक कत्तलखान्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्त मिश्रित पाणी सोडले, तरी त्याविषयी बोलले जात नाही; परंतु हिंदूंचे सण आले की जाणीवपूर्वकृती प्रदूषणाची ओरड केली जाते. यातून तथाकथित पुरोगाम्यांमध्ये पर्यावरणाविषयी किती वरवरचा कळवळा आहे हे दिसून येते. मागे ‘आवाज फाउंडेशन’ने उच्च न्यायालयात दिवाळीतील (Diwali) ध्वनीप्रदूषणाविषयी याचिका दाखल केली होती; मात्र यंदा दिवाळीच्या ध्वनीप्रदूषणामध्ये आवाज कमी झालेला असल्याने त्याविषयी समाधान व्यक्त केले; परंतु हे ‘आवाज फाउंडेशन’ असेल किंवा काही पुरोगामी स्वयंसेवी संस्था असतील अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या काळात हे कुठल्या बिळात जाऊन लपलेल्या असतात ? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘फटाक्यांने होणारे प्रदूषण टाळा’ असे आवाहन केले आहे; मात्र बकरीच्या ईदच्या वेळेत काही पर्यावरणप्रेमींनी ‘मातीची बकरी करून कापणार आहात का?’ पर्यावरण वाचवणार आहात का? असे आवाहन केल्यावर त्या वेळेस मात्र अंनिसवाल्यांनी लोकांना ज्ञान पाजाळत ‘अन्य धर्मियांच्या भावनांचा विचार केला पाहिजे’, असे भूमिका घेतली. एकूणच यांचे पर्यावरणाविषयी जागृती आणि प्रेम हे ढोंगी आहे. त्याविषयी त्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे.
(हेही वाचा – Ind vs NZ, 3rd Test : रोहित, विराट, जाडेजा आणि अश्विनची भारतातील ही अखेरची कसोटी आहे का?)
हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या संदर्भातली मोहीम राबवलेली आहे. त्यात श्रीलक्ष्मी फटाका, श्रीगणेश फटाका, नेताजी फटाका असे देवता-राष्ट्रपुरुषांची चित्र असलेली फटाके फोडू नयेत, यासाठी जनजागृती केली. पोलीस तसेच दुकानदारांना निवेदन देऊन आवाहन केले आहे. कित्येक दुकानदारांनी समितीच्या प्रबोधनानंतर फटाके ठेवणे बंद केले. लोकांमध्ये बदल दिसतो आहे; तसेच केवळ दिवाळी नव्हे, तर होळीला खडकवासला जलाशय रक्षण मोहीम, मशिदींवरील भोंगे, अन्य वर्षभर येणार्या प्रत्येक बाबतीत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि समितीच्या वतीने जनजागृती केली जाते. तशी भूमिका पुरोमागी आणि पर्यावरणप्रेमी घेत नाहीत. ते केवळ हिंदूंच्या उत्सवाला लक्ष्य करतात. अशा तथाकथित पर्यावरणप्रेमीपासून सावध राहिले पाहिजे, असेही सुनील घनवट (Sunil Ghanvat) यांनी शेवटी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community