Fire : उलवेमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; २ जणांचा मृत्यू

57

नवी मुंबईच्या उलवे येथील जावळे गावात किराणा दुकानात गॅस सिलिंडरचा ब्लास्ट (Fire) झाला. त्यामध्ये दोन जण मृत्यमुखी पडले आणि तीन ते चार व्यक्ती जबर घायाळ झाले. या दुकानात अनधिकृतपणे पेट्रोल विक्रीचा संशय होता.

नवी मुंबई येथील उलवेच्या जावळे गावात किराणा दुकानातील गॅस सिलिंडर स्फोट  (Fire)  झाल्यामुळे येथील दोन जण तात्काळ मृत्युमुखी पडले असून अंदाजे तीन ते चार लोक हे भाजल्यामुळे जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमक गाड्या पोहोचल्या असून जखमींना जवळच्या रुग्णालयात घेण्यात आले आहे. सदरचा स्फोट अतिशय भयानक स्वरूपाचा असून यात आणखी काही लोक दगावल्याची किंवा जखमी होण्याची भीती वर्तवली जात आहे. तसेच मिळालेल्या माहितीप्रमाणे या किराणा दुकानात अनधिकृतपणे पेट्रोल विकले जात असल्यामुळे सदरच्या स्फोटाला भयाण स्वरूप आले आहे. खबरदारीसाठी आजूबाजूची घरे आणि रस्ता हा प्रशासनामार्फत रिकामा करण्यात आलेला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.