अयोध्येसारखी दिवाळी काशी-मथुरामध्ये व्हावी: CM Yogi Adityanath

45
अयोध्येसारखी दिवाळी काशी-मथुरामध्ये व्हावी: CM Yogi Adityanath
अयोध्येसारखी दिवाळी काशी-मथुरामध्ये व्हावी: CM Yogi Adityanath

भगवान श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत (Ayodhya) दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. शरयूच्या ५५ घाटांवर एकाच वेळी २८ लाख दिव्यांची रोषणाई करुन ‘राम की पाडी’ उजळून निघाली आहे. राम की पाडीवर दोन नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाले आहेत. अयोध्येत ३५ लाख दिवे प्रज्वलित झाले असले तरी राम की पौडीला अर्ध्या तासात एकाच वेळी २५ लाख १२ हजार ५८५ दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. यासोबतच ११२१ जणांनी एकत्र सरयूची आरती करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. (CM Yogi Adityanath)

(हेही वाचा-Diwali 2024 : नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र)

बुधवारी (३० ऑक्टो.), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी पहिला दिवा लावून दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीराम, माता सीता, आणि लक्ष्मण बनलेल्या कलाकारांसह पुष्पक विमानातून कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण रथावर सवार झाले. मुख्यमंत्री योगी यांनी तो रथ ओढला. हा रथ रामकथा पार्कमध्ये दाखल झाल्यानंतर भाविकांनी एकच जयघोष केला. जय श्रीरामचा नाद सर्वत्र होत होता.

(हेही वाचा-Diwali 2024 : दिवाळीत अभ्यंगस्नान का करतात ?)

योगींनी राम-सीता आणि लक्ष्मण यांची आरती केली तसंच राज तिलक लावला. त्यानंतर त्यांनी राम मंदिरामध्ये विशेष पूजा-अर्चना केली. योगींनी त्यानंतर कार्यक्रमाला संबोधित केलं. मुख्यमंत्री योगी यांनी सांगितलं की, ‘ हजारो वर्षांपूर्वी 14 वर्षांच्या वनवासानंतर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचे अयोध्येमधील आगमन आणि रामराज्याच्या सुरुवातीचं स्मरण म्हणून देशभर भक्तांनी घरात दीप लावून आणि फुलांची सजावट करत हा उत्सव सुरु केला. यंदाची दिवाळी ऐतिहासिक आहे. कारण, 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भगवान श्रीरामलला त्यांच्या घरात विराजमान झाले आहेत. तुमच्याकडून लावण्यात आलेले दिवे हा सनातन धर्माच्या विश्वासाचं प्रतिक आहे. अयोध्या वासियांना पुढं यावं लागेल. अयोध्येसारखी दिवाळी मथुरा-काशीमध्ये देखील व्हायला हवी. ‘ असं योगी म्हणाले. (CM Yogi Adityanath)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.