Maharashtra assembly election 2024: सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार? म्हणाले…

77
Maharashtra assembly election 2024: सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार? म्हणाले...
Maharashtra assembly election 2024: सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार? म्हणाले...

माहीम मतदारसंघातून (Maharashtra assembly election 2024) अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी माघार घ्यावी यासाठी महायुती प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भाजपाची भूमिका आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांचेही तसेच म्हणणे होते,’ असं विधान केलं आहे. त्यामुळेच सरवणकर दबावाखाली अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच स्वत: सरवणकरांनी बुधवारी (३० ऑक्टो.) रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. याच दरम्यान सरवणकरांनी थेट राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही सांगितलं आहे. (Maharashtra assembly election 2024)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
बुधवारी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री यांची देखील मान्यता होती. परंतु काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणं होत की तसं झालं की मतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जातील,” असं सांगितलं. सदा सरवणकरांसंदर्भात बोलताना, “सदा सरवणकर माघार घेणार का हे आम्ही ठरवू बैठकीत,” असंही फडणवीस यांनी म्हटलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. (Maharashtra assembly election 2024)

काय म्हणाले सदा सरवणकर ?
सदा सरवणकर माहीम मतदारसंघातून माघार घेणार का याबद्दल चर्चा सुरु असतानाच त्यांनी एका खासगी मुलाखतीमध्ये राज ठाकरेंना भेटणार असल्याचं म्हटलं आहे. सरवणकर यांनी सोशल मीडियावरुनही, राज ठाकरे यांनाच विनंती करताना “तुम्ही मला समजून घ्या ,आणि मला लढू द्या,” असं म्हटलं आहे. काही झाले तरी मी निवडणूक ही लढविणार आहे असा निश्चय सरवणकरांनी केला आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Maharashtra assembly election 2024)

“राज ठाकरे हे प्रचंड मोठे नेते आहेत. ते माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला या सगळ्यात मदत करतील. सहकार्य करतील. या मतदारसंघाला मी माझी आई मानतो. ते हे नातं तोडणार नाही अशीच माझी अपेक्षा आहे,” असं सरवणकर म्हणाले आहेत. (Maharashtra assembly election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.