MP News: मध्यप्रदेशात दोन दिवसांत ८ हत्तींचा मृत्यू; नेमकं कारण काय?

49
MP News: मध्यप्रदेशात दोन दिवसांत ८ हत्तींचा मृत्यू; नेमकं कारण काय?
MP News: मध्यप्रदेशात दोन दिवसांत ८ हत्तींचा मृत्यू; नेमकं कारण काय?

मध्य प्रदेशच्या (MP News) उमरियातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात दोन दिवसांत आतापर्यंत 8 हत्तींचा मृत्यू झाला आहे. मृत हत्तींमध्ये एक नर आणि 7 मादी आहेत. यामध्ये नर हत्तीचे वय चार ते पाच वर्षे आणि मादीचे वय सुमारे तीन वर्षे आहे. दिल्लीहून NTCA (राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण) चे तीन सदस्यीय पथक तपासासाठी बांधवगडला पोहोचले आहे.

(हेही वाचा-Maharashtra assembly election 2024: सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार? म्हणाले…)

डॉक्टरांनी प्राथमिकरित्या विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आठ डॉक्टरांच्या पथकाने हत्तींचे शवविच्छेदन केले. दोन जेसीबींच्या साहाय्याने खड्डे करण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर सर्व 8 हत्तींचे मृतदेह पांढऱ्या चादरीने झाकण्यात आले. यानंतर त्यांना खड्ड्यात पुरण्यात आले. बीटीआरचे उपसंचालक यांच्या म्हणण्याप्रमाणे, बाजरी खाल्ल्याने हत्तींचा मृत्यू झाला असावा. पोस्टमार्टमनंतरच नेमके कारण समजेल. (MP News)

(हेही वाचा-अयोध्येसारखी दिवाळी काशी-मथुरामध्ये व्हावी: CM Yogi Adityanath)

बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पीके वर्मा म्हणाले, राखीव भागात 60 हून अधिक जंगली हत्ती आहेत, जे वेगवेगळ्या कळपांमध्ये फिरतात. त्यांची काळजी घेण्यासाठी दररोज जंगलात गस्त घालण्यात येते. हत्तींनी काही विषारी किंवा मादक पदार्थ प्राशन केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोडो-कुटकीही याच भागात आढळतात. अशी शक्यता आहे की हत्तींनी जास्त प्रमाणात किंवा कच्ची कोडो-कुटकी खाल्ली असावी, ज्यामुळे निर्जलीकरण देखील होऊ शकते. (MP News)

तपासासाठी पाच पथके तयार
बुधवारी सकाळी भोपाळहून वन विभागाचे स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) पथक बांधवगडला पोहोचले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह पथक परिसराचा तपास करत आहे. यासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. श्वानपथक आणि व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह शोधकार्यात गुंतले. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करून शोध घेतला जात आहे. तपासासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. (MP News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.