चीनबरोबर गस्तकरार (Indian Army) झाल्याची घोषणा भारताने २१ ऑक्टोबरला केली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीननेही त्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर प्रत्यक्ष ताबारेषेवरील संघर्षाच्या दोन ठिकाणांहून सैन्यमाघारी सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. ही प्रक्रिया २८ किंवा २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असे २५ ऑक्टोबरला सूत्रांनी सांगितले होते. सध्या सैन्यमाघारीनंतरच्या स्थितीच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. (Indian Army)
(हेही वाचा-दिवाळीनिमित्त PM Narendra Modi यांनी दिल्या शुभेच्छा!)
दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानुसार, भारतीय सैनिकांनी डेमचॉक आणि डेप्सांगमधून आपली लष्करी उपकरणे मागे घेतली आहेत. दरम्यान, भारत आणि चीनची (India-China) सैन्यमाघारी क्रमबद्ध पद्धतीने होत असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बुधवारीच सांगितले. दोन्ही देशांचे सैनिक कराराचे पालन करत असल्याचे लिन जियान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Indian Army)
(हेही वाचा-अयोध्येसारखी दिवाळी काशी-मथुरामध्ये व्हावी: CM Yogi Adityanath)
भारतात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान, दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान गुरुवारी दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण केली जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे. (Indian Army)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community