Why Muhurat Trading : मूहूर्ताच्या ट्रेडिंगची परंपरा व महत्त्व

61
Muhurat Trading 2024 : मुहूर्ताच्या ट्रेडिंग वेळी काय काळजी घ्यायला हवी?
  • ऋजुता लुकतुके

आपल्याकडे सणासुदीला चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याची परंपरा आहे. आणि मूहूर्ताच्या ट्रेडिंगमागेही तीच भावना आहे. त्यातच व्यापारी वर्ग लक्ष्मीपूजनाला मानतात. त्यादिवशी हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन संवत्सरालाही सुरुवात होते. या दिवशी व्यापारी वर्ग आपल्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. व्यवसायासाठी आवश्यक गोष्टींचीही पूजा करतात. आणि उत्साहाने नवीन वर्षासाठी तयार होतात. (Why Muhurat Trading)

(हेही वाचा- दिवाळीनिमित्त PM Narendra Modi यांनी दिल्या शुभेच्छा!)

तीच भावना शेअर बाजारातील मूहूर्ताच्या सौद्यांमागे असते. त्यादिवशी केलेली गुंतवणूक शुभ मानतात. त्यामुळे सौदा जरी लहान असला तरी त्यामागील भावना मोठी असते. आणि हा सौदा यशदायी ठरेल असा विश्वास त्यामागे असतो. शेअर बाजारातील बहुतेक गुंतवणूकदार किंवा दलाल हे मूहूर्ताचं ट्रेडिंग भक्तिभावाने पार पाडतात. तिथूनच या दिवशी शेअर बाजार अधिकृतरित्या सुरू ठेवण्याची पंरपरा सुरू झाली. (Why Muhurat Trading)

मुहूर्त ट्रेडिंगला लक्ष्मीपूजन केले जाते. यावेळच्या मुहूर्त ट्रेडिंगबद्दल थोडा गोंधळ होता. कारण, दिवाळी नेमकी कुठल्या दिवशी तिथीने सुरू होईल याविषयी संभ्रम होता. पण, आता मुहूर्ताचा दिवस ठरला आहे. बाबत बीएसई आणि एनएसईकडून वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल. सध्या बीएसईच्या वेबसाईटवर १ नोव्हेंबर हीच तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Why Muhurat Trading)

(हेही वाचा- MP News: मध्यप्रदेशात दोन दिवसांत ८ हत्तींचा मृत्यू; नेमकं कारण काय?)

भारतीय परंपरेनुसार, व्यापारी समाज दिवाळीच्या दिवसाला नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी अगदी एका तासांचे सौदे होत असले तरी हा समाज मोठ्या प्रमाणावर यात सहभागी होतो. आणि अगदी सणाच्या वातावरणात मुहूर्ताचं ट्रेडिंग पार पडतं. छोट्या गुंतवणूकदारांनी मात्र मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कारण या दिवशी शेअर बाजारात मोठे चढउतार येतात. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. (Why Muhurat Trading)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.