Ravi Raja : मुंबई काँग्रेसच्या नेत्याने सोडली ४४ वर्षांची साथ; भाजपात केला प्रवेश

185
Ravi Raja : मुंबई काँग्रेसच्या नेत्याने सोडली ४४ वर्षांची साथ; भाजपात केला प्रवेश
Ravi Raja : मुंबई काँग्रेसच्या नेत्याने सोडली ४४ वर्षांची साथ; भाजपात केला प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते प्रस्थापित पक्षांची साथ सोडून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. मुंबई काँग्रेसलाही असाच मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते राहिलेले रवी राजा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नाही; म्हणून नाराज झालेले राजा भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्या सोडल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजा (Ravi Raja) यांनी ४० वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेसचे काम केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Indian Army: पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये होणार दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण!)

”माझ्या 44 वर्षांच्या काँग्रेस पक्षाच्या सेवेचा आदर केला जात नसल्यावर माझा विश्वास बसला आहे. यामुळे मी सर्व पदांचा, पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात राजा यांनी म्हटले आहे.

राजा हे १९८० पासून युवक काँग्रेसशी जोडले गेले होते. विधानसभेला उमेदवारी मिळावी, अशी मागणी राजा यांनी केली होती. परंतू, काँग्रेसने राजा यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते नाराज झाले होते.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. बाबू दरेकर हे उबाठा सेनेचे आहेत. त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने आमची घाटकोपरची ताकदही वाढणार आहे. त्यामुळे मी दरेकर यांचेही स्वागत करतो. आता ५ किंवा ६ नोव्हेंबरपासून प्रचार सुरु झालेला असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.