Maharashtra Assembly Election 2024 : एकाच नावामुळे उमेदवारांच्या डोकेदुखीत भर

108
Assembly Election 2024 : चांदिवली, कुर्ल्यात नावाशी साधर्म्य असणारे डमी उमेदवार

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत डमी उमेदवारांच्या उपस्थितीमुळे प्रमुख उमेदवारांच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात शिंदे गटाचे सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि महायुतीचे बंडखोर अपक्ष समीर भुजबळ हे प्रमुख स्पर्धक असताना, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी डमी उमेदवारांचा वापर केल्याचा आरोप होत आहे. सुहास कांदेंविरुद्ध दुसरे सुहास बाबुराव कांदे हे धाराशीवचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. याशिवाय गणेश धात्रकांविरुद्ध दुसरे गणेश धात्रक नावाचे उमेदवारही मैदानात उतरले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Ravi Raja : मुंबई काँग्रेसच्या नेत्याने सोडली ४४ वर्षांची साथ; भाजपात केला प्रवेश)

याबाबत सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते ही योजना फक्त मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. समीर भुजबळ यांनी धाराशीवच्या सुहास कांदेंना उमेदवारी भरण्यासाठी पाठबळ दिल्याचा दावा कांदेंनी केला आहे. यामुळे नांदगाव मतदारसंघात दोन सुहास कांदे आणि दोन गणेश धात्रक नावाचे उमेदवार मैदानात असतील त्याचा थेट परिणाम मूळ उमेदवारांच्या मतांवर होण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळांनी ‘भगरे पॅटर्न’ नावाने ओळखला जाणारा लोकसभेतील डमी उमेदवारांचा वापर विधानसभेलाही सुरु केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा पॅटर्न २०१९ मध्ये लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात वापरण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार गटाचे भास्कर गुरुजींविरुद्ध भास्कर बाबू भगरे नावाचे अपक्ष उमेदवार उभे राहिले होते. दोन्ही उमेदवारांचे चिन्ह तुतारीच्या आसपासचे होते. त्यामुळे मतदार संभ्रमित झाले. याचा परिणाम असा झाला की मूळ उमेदवार भास्कर गुरुजी जरी जिंकले असले तरी डमी भास्कर भगरेंनीही मोठ्या संख्येने मते घेतली होती.

या डमी उमेदवारांचा वापर केवळ निवडणूक यंत्रणेत गोंधळ निर्माण करण्यासाठीच नसून विशिष्ट उमेदवारांची मते विभागण्याच्या उद्देशाने होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खेळीमुळे निवडणुकीचे राजकारण अधिकच गढूळ झाले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.