भाई, मैं गोरेगाव में रेहता हूँ; मुंबईकराला जेव्हा Donald Trump टॅग करतात…

95
भाई, मैं गोरेगाव में रेहता हूँ; मुंबईकराला जेव्हा Donald Trump टॅग करतात...
भाई, मैं गोरेगाव में रेहता हूँ; मुंबईकराला जेव्हा Donald Trump टॅग करतात...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जगभर चर्चा आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात थेट सामना होणार असून जागतिक महासता कुणाच्या हातात जाणार, याविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यांपैकी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अशाच प्रयत्नामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकन मतदारांना मत देण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी एका सोशल मीडिया अकाऊंटला टॅग करून आवाहन केल्यानंतर त्यांना अस्सल मुंबईकर टोला ऐकावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर Trendulkar नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटला टॅग करून मतदानाचे आवाहन केले आहे. “नॉर्थ कॅरोलिना, मतपत्रिकेसाठी विनंती करण्याचा हा शेवटचा दिवस आहे”, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, नोंदणीसाठी काय करावे लागेल, हे मतदारांना समजण्यासाठी खाली लिंकदेखील दिली आहे.

पण हे Trendulkar अकाऊंट कुणाचं आहे, हे समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्या पोस्टला ट्रोल केले जात आहे. खुद्द या व्यक्तीनेच ट्रम्प (Donald Trump) यांची पोस्ट रीट्वीट करून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “भाई, मैं गोरेगाव में रेहता हूँ”, असे या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

एका मुंबईकरालाच हे ट्वीट टॅग झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचाही पाऊस पडला आहे. “तू फार नशीबवान आहेस मित्रा. ट्रम्प यांनी तुला टॅग केलं आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे, तर एका युजरने “आम्ही भारतातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला समर्थन देऊ”, अशी पोस्ट केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.