विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही पक्ष प्रवेश सुरु आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी काँग्रेसला राम राम करत गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
2024 ला उमेदवारी नाकारली
काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच नवीन उमेदवार निवडतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जाधव यांच्या या प्रवेशाने शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जाधव यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. जयश्री जाधव (Jayashree Jadhav) या भाजपाच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून शिवसेनचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. जाधव यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपाचे सत्यजित कदम यांचा पराभव केला आणि त्या आमदार बनल्या. परंतू २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
Join Our WhatsApp Community