सध्या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. तर 13 राज्यांत पोट निवडणुका होत आहेत. याकडे सर्वांचे लक्ष असताना सिक्कीममध्ये (Sikkim) मोठी राजकीय घडामोड घडली. या राज्यात विरोधी पक्षच संपला आहे. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्ष नसलेले देशातील सिक्कीम हे एकमेव राज्य बनले आहे.
(हेही वाचा Indian Army: पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये होणार दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण!)
एकमेव दोन उमेदवारांचे अर्ज झाले बाद
तेथील प्रमुख विरोधी पक्ष सिक्कीम (Sikkim) डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) संपला आहे. सिक्कीममध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. सोरेंग-चाकुंग आणि नामची-सिंघीथांग या जागांवर एसडीएफने उमेदवार उतरविले होते. परंतू, या उमेदवारांचे अर्ज अयोग्य घोषित करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान होणार होते. यामुळे सत्ताधारी एसकेएमचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रेम बहादुर भंडारी आणि डेनियल राय यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामुळे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार आदित्य गोळे आणि सतीश चंद्र राय हे बिनविरोध निवडले गेले आहेत. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वात एसकेएमकडे आता विधानसभेचे सर्वच्या सर्व ३२ आमदार असणार आहेत. (Sikkim)
Join Our WhatsApp Community