Hindus in Bangladesh : बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांची मालिका सुरुच; इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

58
Hindus in Bangladesh : बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांची मालिका सुरुच; इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Hindus in Bangladesh : बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांची मालिका सुरुच; इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

बांगलादेशातील चटगांव येथे 25 ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सभेत बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप इस्कॉनचे (ISKCON) सचिव चिन्मय दास ब्रह्मचारी यांच्यावर करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाच्या वर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकवण्यात आल्याचा आरोप चटगांव पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. प्रत्यक्षात तो ध्वज बांगलादेशचा नाही, असा खुलासा चिन्मय दास यांनी केला आहे. (Hindus in Bangladesh)

(हेही वाचा – मानखुर्द-शिवाजी नगर मधील Samajwadi Party कार्यालय बनले नशेचा अड्डा)

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे नवे उदाहरण समोर आले आहे. इस्कॉन समूहाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या चिन्मय दास यांच्याविरोधात बुधवारी चटगांव जिल्ह्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिन्मय दास ब्रह्मचारी आणि इतर 19 नेते आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25 ऑक्टोबर रोजी चटगांव येथे झालेल्या सभेत बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप चिन्मय दास ब्रह्मचारीवर आहे. आंदोलनादरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाच्या वर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकवण्यात आल्याचा आरोप चटगांव पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.

बांगलादेशचा राष्ट्रध्वज वापरला नाही – चिन्मय दास यांनी केला खुलासा

चिन्मय दास हे बांगलादेशातील इस्कॉन ट्रस्टचे सचिव आहेत आणि हिंदूंवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवत आले आहेत. चिन्मय दास यांनीही या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर नव्हे, तर चंद्र-ताऱ्यांच्या ध्वजावर भगवा ध्वज फडकवण्यात आला होता, असे ते म्हणाले. येथे विशेष म्हणजे बांगलादेशच्या राष्ट्रध्वजात चंद्र आणि तारा नाही.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार पडल्यानंतर आणि महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात तिथे अल्पसंख्य असलेल्या हिंदूंचा सातत्याने छळ केला जात आहे. 28 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील फरिदपूर जिल्ह्यात इयत्ता 11 वीचा हिंदू विद्यार्थी असलेल्या हृदय पालवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशातील निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्यांची चौकशी करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली आहे. (Hindus in Bangladesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.