Maharashtra Assembly Election : जागावाटपात मविआत पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमध्ये भाजपाने मारली बाजी

65
Maharashtra Assembly Election : जागावाटपात मविआत पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमध्ये भाजपाने मारली बाजी
  • प्रतिनिधी

राज्यभरात विधानसभा निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आता सर्वांच्या नजरा चार तारखेवर लागून राहिल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे. जागावाटपात महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या घटक पक्षांनी आपल्या अधिकृत यादी काही प्रमाणात जाहीर केल्या. यामध्ये विशेषतः मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला एक उमेदवार देण्यात महाविकास आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महायुती त भाजपाने बाजी मारल्याचे चित्र समोर येत आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – मानखुर्द-शिवाजी नगर मधील Samajwadi Party कार्यालय बनले नशेचा अड्डा)

मराठवाड्यात पवारांची राष्ट्रवादी सर्वत्र

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस सह पवारांचे राष्ट्रवादीने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. याठी जिल्ह्यांमध्ये शरद पवारांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला एक तरी उमेदवार दिला आहेच. मात्र काँग्रेस पक्षाला बीड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आपला एकही उमेदवार देता आला नाही. तर दुसरीकडे शिवसेना उबाठाने एकूण १६ ठिकाणी जरी उमेदवार दिले असले तरी त्यांना देखील बीड जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सहा उमेदवार उबाठाने दिले आहेत. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – भाई, मैं गोरेगाव में रेहता हूँ; मुंबईकराला जेव्हा Donald Trump टॅग करतात…)

महायुतीत मराठवाड्यात भाजपाचा वरचश्मा

मराठवाड्यामध्ये एकूण आठ जिल्ह्यांमध्ये ४६ उमेदवार विधानसभेला आहेत. असे असले तरी भारतीय जनता पार्टीने २० जागा आपल्या पदरात पडत प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी किमान एक तरी उमेदवार दिलेला आहे. मराठा आरक्षणाची सर्वात जास्त धग तसेच जरांगे फॅक्टर मराठवाड्यात असला तरी भारतीय जनता पार्टीने मात्र यामध्ये बाजी मारली आहे. (Maharashtra Assembly Election)

दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र मराठवाड्यात नऊ जागा मिळाल्या आहेत. असे असले तरी अजित पवारांना जालना, धाराशिव तसेच संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एकही जागा मिळालेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा फटका बसला असला तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकांना पाहता महायुतीला किती जागा निवडून आणता येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.