Nicholas Pooran : लखनौ सुपरजायंट्सनी निकोलस पूरनला राखून ठेवण्यासाठी मोजले १८ कोटी रुपये

Nicholas Pooran : लखनौ संघाचा तो पहिला कायम ठेवलेला खेळाडू असेल. 

51
Nicholas Pooran : लखनौ सुपरजायंट्सनी निकोलस पूरनला राखून ठेवण्यासाठी मोजले १८ कोटी रुपये
  •  ऋजुता लुकतुके

लखनौ सुपरजायंट्स संघाने निकोलस पूरनला (Nicholas Pooran) संघात कायम ठेवण्याचं ठरवलंय. संघातील पहिला कायम ठेवलेला खेळाडू म्हणून त्याला १८ कोटी रुपये मिळतील. निकोलस अलीकडेच कोलकाता इथं संजीव गोयंका यांना भेटला आहे. तिथेच हा करार पार पडल्याचं क्रिकबझने म्हटलं आहे. नवीन हंगामासाठी करारबद्ध झालेला तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही विराट कोहलीला कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

संघाचा पहिला कायम ठेवलेला खेळाडू असल्यामुळे आयपीएलच्या नियमानुसार त्याला १८ कोटी रुपये मिळतील. २०२३ साली सनरायझर्स हैद्राबादने निकोलसला (Nicholas Pooran) सोडून दिलं होतं. तिथून तो लखनौ संघात आला आणि यंदाचा आयपीएल हंगाम त्याने आपल्या फलंदाजीने गाजवला होता.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : जागावाटपात मविआत पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमध्ये भाजपाने मारली बाजी)

‘पूरनकडे (Nicholas Pooran) विजेत्याला लागणारी मानसिकता आहे. तो विचारी खेळाडू आहे आणि फलंदाजीच्या क्रमात तो कुठेही खेळू शकतो. सामन्याचा रागरंग बघून फलंदाजी करू शकतो,’ असं लखनौ संघ प्रशासनातील सूत्रांनी क्रिकबझला सांगितलं आहे. शिवाय निकोलस यष्टीरक्षणही करू शकतो. त्यामुळे लखनौ संघासाठी तो मोलाचा खेळाडू ठरला आहे. मागच्या हंगामात लखनौ संघाचा कर्णधार के एल राहुल आणि मालक संजीव गोयंका यांचं मोठं भांडण झालं होतं आणि त्यानंतर संघ प्रशासन राहुलला कायम ठेवण्याची शक्यता कमीच होती.

पण, निकोलस पूरनने (Nicholas Pooran) हंगामात ४९९ धावा करताना ३ मजबूत अर्धशतकं झळकावली होती. यात ३४ चौकार आणि ३६ षटकार ठोकले होते. निकोलस पूरनच्या साथीने लखनौ संघ मयांक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई आणि आयुष बदोनी यांना कायम ठेवणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.