- प्रतिनिधी
राज्यात विधानसभेचे निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. असे असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले असून मोठ्या प्रमाणात कंदीलही लावले आहेत. मात्र मनसेचे पक्षचिन्ह असलेले हे कंदील लावण्यास किंवा मनसेचा दीपोत्सव साजरा करण्यास आचारसंहितेमध्ये परवानगी कशी काय दिली ? असा आक्षेप घेत शिवसेना उबाठाने निवडणूक आयोगाकडे याची रीतसर तक्रार केली आहे. (Shivaji Park Deepotsav)
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये २८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. या दीपोत्सवाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडले यावेळी सिने कलाकार देखील उपस्थित होते गेली बारा वर्ष हा दीपोत्सव साजरा केला जातो. (Shivaji Park Deepotsav)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : जागावाटपात मविआत पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमध्ये भाजपाने मारली बाजी)
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन
छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी बाबत तसेच, ह्या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, या मागण्यांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची शिवसेना उबाठाचे नेते, सचिव खासदार अनिल देसाई यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. फारच कमी काळात अधिक उत्सव मुंबई अतिशय प्रसिद्ध झाला आणि मुंबईकरांचे खास आकर्षण देखील ठरला आहे. या काळामध्ये तरुण तरुणी या ठिकाणी येऊन छायाचित्रे काढत असतात. (Shivaji Park Deepotsav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community