Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये काँग्रेसला सुरुंग, कार्यकारी अध्यक्ष भाजपात

39
Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये काँग्रेसला सुरुंग, कार्यकारी अध्यक्ष भाजपात
  • प्रतिनिधी 

झारखंड मध्ये इंडी आघाडीला चांगलाच फटका बसला असून भाजपाच्या एका खेळीमुळे पक्षाची ताकद वाढविण्यात भाजपा यशस्वी झाला आहे. त्याचे झाले असे की, काँग्रेसचे कार्यकारी माजी अध्यक्ष मानस सिन्हा यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे झारखंडच्या निवडणुकीवर जबरदस्त परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे माजी कार्यकारी अध्यक्ष मानस सिन्हा यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राज्यात भाजपाची ताकद वाढली आहे. (Jharkhand Assembly Election)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : जागावाटपात मविआत पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमध्ये भाजपाने मारली बाजी)

मानस सिन्हा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून रविवारी रात्री राजीनामा दिला होता. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मागील २७ वर्षांपासून मी काँग्रेससोबत जोडलो गेलो होतो. पक्षाने जे काम दिले ते प्रामाणिकपणे केले. पण माझ्या मेहनतीला पक्षाने महत्व दिले नाही. काँग्रेसने सिन्हा यांनी उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मला पक्षाने चौथ्यांदा अपमानित केले आहे. सहन करण्याचीही मर्यादा असते. आता सहनशक्ती संपली आहे. आतापर्यंत काँग्रेसचा विचार करत होतो, आता माझा विचार करणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. (Jharkhand Assembly Election)

(हेही वाचा – ऐन विधानसभा निवडणुकीत वंचितचे अध्यक्ष Prakash Ambedkar यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल)

सिन्हा यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड भाजपाचे प्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार निवडताना यावेळी काँग्रेसने दलबदलू किंवा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी देणे टाळले आहे. (Jharkhand Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.