Mohan Bhagwat 554 प्रचारकांसोबत साजरी करणार दिवाळी

33
Mohan Bhagwat 554 प्रचारकांसोबत साजरी करणार दिवाळी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यंदाची दिवाळी मध्यप्रदेशात साजरी करणार आहेत. ग्वाल्हेरमध्ये संघाच्या प्रचारकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यात 554 प्रचारकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ग्वाल्हेरमध्ये प्रचारकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 554 प्रचारकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण वर्गाची सुरुवात गुरुवार दि. 31 ऑक्टोबरपासून होत असून 4 नोव्हेंबरपर्यत हे चालणार आहे.

ग्वाल्हेरच्या केदारपूर धाम येथे 4 नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण वर्ग चालणार आहे. यामुळे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची दिवाळी ग्वाल्हेरमध्येच साजरी होणार आहे. या प्रशिक्षण वर्गात संघाच्या 31 संघटनांचे 554 प्रचारक सहभागी होणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह सर्व सहसरकारवाह व संघाचे इतर प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहेत.

(हेही वाचा – ऐन विधानसभा निवडणुकीत वंचितचे अध्यक्ष Prakash Ambedkar यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल)

शिवपुरी लिंक रोडवर असलेल्या केदारपूरच्या सरस्वती शिशु मंदिरात या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ग्वाल्हेरला पोहोचले आहेत. डॉ. भागवत (Mohan Bhagwat) गुरुवारी प्रचारकांसह दिवाळी सण साजरा करणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासनाने आजूबाजूचा परिसर नो फ्लाय झोन घोषित केला आहे. एसपी धरमवीर सिंग यांनी या भागात ड्रोन, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून इत्यादींवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

संघाच्या दृष्टिकोनातून हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व 31 संलग्न संघटनांचे 554 प्रचारक एकत्र उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या प्रशिक्षण वर्गात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कडेकोट बंदोबस्तात संघाचे सर संघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) रस्त्याने ग्वाल्हेरला पोहोचले आहेत. त्यांनी थेट केदारपूर येथील चौकात पोहोचून संघाच्या अखिल भारतीय स्तरावरील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी आणि डॉ. मनमोहन वैद्य यांच्यासह केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत बसून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविली. संघप्रमुख रामकृष्ण आश्रमात गेले. तेथील उपक्रमांचे निरीक्षण केले. यानंतर ते संघाने आयोजित केलेले आरोग्य धाम पाहण्यासाठीही गेले. संघाचा हा प्रशिक्षण वर्ग आज सकाळपासून सुरू झाला आहे. या वर्गात शिक्षण व्यवस्था, आरोग्य आणि सामाजिक बदलांवर चर्चा होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.