- ऋजुता लुकतुके
शुक्रवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी कसोटी सुरू होईल तेव्हा हेडलाईन हीच असेल की, भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध व्हाईटवॉश टाळणार का? पहिल्या दोन्ही कसोटींत किवी संघाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. त्यानंतर आता मालिकेचा निदान शेवट गोड करायचा तर भारतीय संघाला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. पण, वेगळं म्हणजे नेमकं काय? संघात बदल करायचे की, आहे त्या खेळाडूंनी वेगळी म्हणजे चांगली कामगिरी करून दाखवायची? नेमकं कुठलं वेगळेपण भारतीय संघ प्रशासन स्वीकारतं आणि संघ निवड कशी करतं यावर आता फक्त चर्चा शक्य आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा – Shivaji Park Deepotsav : शिवाजी पार्कमधील दीपोत्सवावर उबाठा गटाचा आक्षेप)
पुणे कसोटीत शुभमन गिल संघात परतला. त्यामुळे मधल्या फळीत के एल राहुलला तंबूत बसावं लागलं. पण, भारतीय फलंदाजी दोन्ही डावातही ढेपाळली. धड दोनशे धावाही दोन्ही डावांत झाल्या नाहीत. पण, हे फलंदाजांचं अपयश मानून त्यावर काम करायचं की, फलंदाजच बदलायचे हा विचार सध्या सुरू आहे. एक माहिती मिळतेय ती म्हणजे सर्फराझ खानला चौथ्या क्रमांकावर खेळवायचं. फिरकीविरुद्ध अपयशी ठरणाऱ्या विराटला पाचव्या क्रमांकावर खेळवायचं. सर्फराझला पुणे कसोटीत सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली आहे. त्यामुळे हा बदल फलंदाजीच्या क्रमात होऊ शकतो. त्यामुळे सर्फराझला जम बसवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. (Ind vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा – Nicholas Pooran : लखनौ सुपरजायंट्सनी निकोलस पूरनला राखून ठेवण्यासाठी मोजले १८ कोटी रुपये)
तर रिषभ पंत दुसऱ्या कसोटीत पुरेसा तंदुरुस्त नसताना त्याला खेळवण्यात आलं. आता ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा विचार करता त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी संघात एकतर ध्रुव जुरेल किंवा के एल राहुल येऊ शकतो. कसोटीत राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारीही पार पाडावी लागेल. त्यामुळे राहुल की, जुरेल हा संघ प्रशासनासमोरचा प्रश्न असेल. गोलंदाजीत पाचही गोलंदाज म्हणावे तसे यशस्वी झाले नाहीएत. ही मालिका जर आपण जिंकलो असतो तर बुमराहला विश्रांती देण्याचा गंभीरचा विचार होता. पण, आता आपण पिछाडीवर आहोत. त्यामुळे बुमराहला खेळवावं लागेल. त्याच्या जोडीला सिराज की आकाशदीप हा प्रश्न आहे. वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी ही पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणारी नसेल. त्यामुळे फलंदाजांनाही इथं संधी मिळेल. पण, ती उचलण्याची तयारी भारतीय फलंदाजांना आता दाखवावी लागेल. (Ind vs NZ, 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community