कालपर्यंत केवळ मराठा समाजाचे हित, मराठा आरक्षण यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगणारे मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी आता विधानसभा निवडणुकीत आता त्यांची विचारधारा बदलत असल्याचे दिसत आहे. मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाला एकत्रित करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. यानिमित्त अंतरवाली सराटी येथे मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी आनंदराज आंबेडकर देखील उपस्थित होते.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले, केवळ एकट्या मराठा समाजामुळे निवडणुकीत यश मिळणार नाही. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजाशीही समीकरणे जुळवण्याचा जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत. याच संदर्भात एक निर्णायक बैठक आंतरवाली सराटी येथे बोलावली होती. अन्यायाचे संकट आम्हाला परतून लावायचे असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला संपवायला निघालेल्याला आम्हाला संपवायचे आहे. मराठा समाजाने जे स्वन्न पाहण्यात आले होते, ते स्वप्न आज साकार होणार असल्याचे जरांगे पाटील (Jarange Patil) म्हणाले.
(हेही वाचा Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन)
मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी म्हणाले, महापुरुष महाराष्ट्रात जन्माला आले होते. मी उत्तर प्रदेशचा आहे. मात्र, मनोज जरांगे मला मराठी शिकवतील आणि मी जरांगेंना हिंदी शिकवेन असे आमच्यात ठरले आहे. संपूर्ण देशात जरांगेंची गरज आहे. त्यामुळे हिंदी शिकणे गरजेचे आहे. मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बोलण्याचा अनुवाद करेन. मनोज जरागेंच्या रुपाने भारताला आधुनिक गांधी-आंबेडकर आणि कलाम मिळणार आहे, असे गौरवोद्गार मनोज जरांगे (Jarange Patil) यांच्याविषयी यावेळी त्यांनी काढले.
Join Our WhatsApp Community