Maharashtra Assembly Poll : मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या केदार दिघेंना नेटकऱ्यांनी ठोकले!

150
Maharashtra Assembly Poll : मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या केदार दिघेंना नेटकऱ्यांनी ठोकले!
  • खास प्रतिनिधी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना उबाठाचे कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे यांना नेटकऱ्यांनी त्यांची जागा दाखवून दिली.

काय म्हणाले केदार दिघे?

केदार दिघे यांनी ‘X’वर एक पोस्ट केली आहे ज्यात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली असून त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याची भाषा वापरण्यात आली आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, “कोपरी पाचपाखडीतील नागरिकांना नम्र विनंती…२० वर्षे झाली एक माणूस फक्त विकासाची गाजर दाखवतो आहे.. मुख्यमंत्री पदी राहूनही बदल नाही.आता हा माणूस बदलण्याची वेळ आलीय…सर्वशक्तिमान समजणाऱ्या अहंकारी रावणाचाही पराभव झाला होता…यांचाही होईल!”


(हेही वाचा – Assembly Election 2024 : चांदिवली, कुर्ल्यात नावाशी साधर्म्य असणारे डमी उमेदवार)

हा विकास नाही तर काय?

यावर नेटकारी चांगलेच संतापले. “दादा, ठाणे मुंबईच्या 10 पटीने विकसित होतेय.. गाजर वगैरे ठेवा बाजूला.. आज मुंबई, उपनगर मधील लोकं ठाणेत फ्लॅट घेणाच्या विचारात आहेत.. विकास नाही तर काय?” असे एकाने ठणकावले.

एकाने तर काही न बोलताच केदार दिघे यांची काढली. “तुमच्या आडनावामुळे रिप्लाय करावा वाटतं नाहीये बाकी समजून घ्या,” अशी प्रतिक्रिया दिली.

तुमची ओळख काय…?

इतर प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत: “खोटं बोलून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका. गेल्या २० वर्षात धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जीवनीगाथा महाराष्ट्र भर पोहोचवण्यासाठी तुम्ही काय केलं यांच सांगा. धर्मवीर आनंद दिघे साहेब कोण आहेत आम्हाला 2022 नंतर कळलं…इतका उशीराने का कळलं.”

“एकनाथ शिंदे जर नसते तर अजून किती तरी दिवस आनंद दिघे कोण होते, हे कोणालाच कळले नसते… संभ्रम पसरवू नका… आज पर्यंत तुम्हीं कोणती समाजकार्य केले आहेत तेवढं सांगा… आनंद दिघे यांचे नातू ह्यापलिकडे तुमची ओळख काय…? की तुम्हीं पण उधोजींसारखे टाळूवरचे खाणारे…?”

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : निवडणुकीआधीच महायुती एक जागा हरली!)

घर कोंबडा किंग

“दादा, त्या २० वर्षांपेकी १७.५ वर्ष तर घर कोंबडा किंग होता ना. तो काय करत होता तेंव्हा आणि इतकी तुम्ही का गप्प होता ?? का डांगीत दम नव्हता,” असे म्हणत अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

“आत्तापर्यंत दिघ्यांचा पुतण्या म्हणून तू काय काम केलं ते सांग ना.गेले अडीच वर्ष सोडले तर शिंदे काय मुख्यमंत्री नव्हते. मात्र दिघे आडनाव हे तू आयुष्यभर लावतोयस काय काय केलंय ते सांग.”

“आनंद दिघेंना कोणी पुतण्या होता किंवा आहे हेच आम्हाला २०२२ ला कळलं इतके वर्ष उद्धवला आठवत नाही आली का,”

“अरे मित्रा! मी ठाण्यात राहतो, मुख्यमंत्री असुनही तो माणूस सामान्यांना भेटत असतो,” असे एकाने सांगून शिंदे यांची बाजू उचलून धरली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.