- ऋजुता लुकतुके
भारत विरुद्घ न्यूझीलंड तिसरी कसोटी शुक्रवार सकाळपासून सुरू होत असताना भारतीय संघाच्या गोटातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराहला या कसोटीसाठी विश्रांती दिली जाऊ शकते, असं क्रिकइन्फो वेबसाईटने म्हटलं आहे. जसप्रीत बुमराहने स्वत: विश्रांतीची मागणी केली की, संघ प्रशासनाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार करून त्याला विश्रांती दिली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. खरंतर गुरुवारी संध्याकाळ पर्यंत भारतीय संघाचं सराव सत्र सुरू होतं आणि तिथे बुमराने नेट्समध्ये पुरेपूर गोलंदाजी केली. तिथून असे कुठलेही संकेत मिळत नव्हते. पण, इतक्यात सूत्रांच्या हवाल्याने क्रिकइन्फो वेबसाईटने ही बातमी दिली आहे. संघ प्रशासनाचा अंतिम निर्णय शुक्रवारी सकाळी नाणेफेकीच्या वेळीच समजू शकेल. (Ind vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा – Gangster Satish Kalia वर गुन्हा दाखल; पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर व्यावसायिकाकडे मागितली खंडणी)
‘मुंबईतील हवामान दमट आहे. त्यामुळे खेळाडूंना घाम खूप येतो. अशावेळी बुमराह नेट्समध्ये कमीच गोलंदाजी करेल. पण, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे,’ असं गंभीर गुरुवारी सकाळी मीडियाशी बोलताना म्हणाला होता. त्यातच संध्याकाळी अशी बातमी आली आहे. भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यातच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथे पाच सलग कसोटी संघाला खेळायच्या आहेत. त्यामुळे बुमराहला विश्रांती देण्याचा विचार आधीच गौतम गंभीरच्या मनात घोळत होता आणि त्याने तो बोलूनही दाखवला होता. पण, भारतीय संघ मालिकेत ०-२ ने पिछाडीवर पडल्यावर बुमराह मुंबईत खेळेल अशी शक्यता निर्माण झाली होती. (Ind vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या केदार दिघेंना नेटकऱ्यांनी ठोकले!)
बुमराह या हंगामात देशात झालेल्या चारही कसोटी खेळला आहे आणि यात त्याने ९० षटकं टाकली आहेत. तसंच १४ बळीही घेतले आहेत. पण, तेज गोलंदाजांना भारतात गोलंदाजी करताना हवामानाचा त्रास होतो. ते पाहता बुमराहला भारतात जपून वापरण्याची संघाची रणनिती आहे. मुंबईत विश्रांती देणं हा त्याचाच भाग असावा. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी जसप्रीत बुमराहकडे उपकप्तानीही सोपवण्यात आली होती. त्यामुळे संघाचा तो महत्त्वाचा घटक आहे. पण, मुंबईची लाल मातीने बनलेली खेळपट्टी तेज गोलंदाजीला साथ देण्याची शक्यता तशी कमीच आहे. पहिल्या दिवशी मात्र थोडी उसळी चेंडूला मिळू शकते. बुमराह खेळला नाही तर सिराज आणि आकाशदीप किंवा हर्षित राणाला संघात संधी मिळू शकते. (Ind vs NZ, 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community