सीबीएसई, आयसीएसई बोर्डांची पुस्तके महापालिकेच्या मुलांना मिळणार मोफत

मनोहर पुस्तक भांडार हे विक्रेत पात्र ठरले असून त्यांच्याकडून ८२ लाख ०६ हजार ४०८ रुपयांची पुस्तकांची खरेदी केली जाणार आहे.

125

मुंबई महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ११ सीबीएसई व १ आयसीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठीची आवश्यक पुस्तकांची खरेदी करण्यात येत आहे. या सर्व शाळांसाठी २७ हजार १२६ पुस्तकांच्या संचाची खरेदी होत असून या पुस्तकांच्या खरेदीसाठी सुमारे ८२ लाख रुपये खर्च केले जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरु झालेल्या असून पुस्तकांमधील काही अभ्यासालाही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काही अभ्यास झाल्यानंतर आता महापालिका पुस्तकांची खरेदी करत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचा काही महिन्यांचा कालावधी लोटून गेल्यानंतर मुलांना ही पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात नविन १० सीबीएसई सुरु करणार

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने २०२०-२१मध्ये दादर वुलन मिल शाळेत आयसीएसई बोर्डाची व जोगेश्वरी पुनम नगर शाळेत सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करण्यात आली. या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहता महापालिका शिक्षण विभागाने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात नविन १० सीबीएसई सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण समिती व महापालिकेच्या मान्यतेनुसार या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सध्या एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम घेतला जातो. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या बालभारती या संस्थेमार्फत पुरवली जात आहे. त्यामुळे नव्याने सुरु करण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांकरता एनटीआरसी या संस्थेमार्फत पुस्तके तयार केली जातात व आयसीएसई बोर्डाच्या शाळांकरता खासगी प्रकाशनाच्या प्रकाशकांद्वारे पुस्तकांची निर्मिती केली जाते.

(हेही वाचा : केंद्राकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा घेण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर!)

 ८२ लाख ०६ हजार ४०८ रुपयांची पुस्तकांची खरेदी केली जाणार!

त्यामुळे या दोन्ही बोर्डाच्या शाळांकरता एनसीईआरटी मार्फत व निवडक खासगी प्रकाशकांमार्फत पुस्तके निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करणे आवश्यक होते. त्यामुळे यासाठी नेमलेल्या समितीने एनसीईआरटी संस्थेमार्फत सर्व विषयांची पुस्तके प्रकाशित केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मनोहर पुस्तक भांडार हे विक्रेत पात्र ठरले असून त्यांच्याकडून ८२ लाख ०६ हजार ४०८ रुपयांची पुस्तकांची खरेदी केली जाणार आहे. नर्सरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकांची खरेदी केली जाणार आहे. जून महिन्यामध्ये शाळा सुरु झालेल्या असताना प्रत्यक्षात ही पुस्तके जुलै महिन्यानंतर दिली जाणार आहेत, असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.