LPG Cylinder : ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन किंमत

69
LPG Cylinder : ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन किंमत
LPG Cylinder : ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन किंमत

१ नोव्हेंबर २०२४ पासून व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती वाढवण्यात आल्या आहेत. व्यावसायिक कामासाठी वापरला जाणारा सिलिंडर सलग चौथ्या महिन्यात महागला आहे. इंडियन ऑइलने पहिल्या नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमती ६२ रुपयांनी वाढवली ज्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत १६९२.५० रुपयांवरून १७५४.५० रुपये झाली आहे. तर, राजधानी दिल्लीत हॉटेल, रेस्टोरंटच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरसाठी १,८०२ रुपये मोजावे लागतील.

(हेही वाचा-Assembly Election : राज्यात 22 लाख 22 हजार 704 नवीन मतदार करणार मतदान)

१ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे तर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच छठ पूजेचा सणही साजरा केला जाईल. त्यानंतर, नोव्हेंबर महिन्यापासून लग्नसराईचा हंगामही सुरू होत असून त्यापूर्वी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत वाढवून महागाईचा दणका दिला आहे. मार्चपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती.

(हेही वाचा-Police : राज्यातील २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृह विभागाने काढला आदेश )

व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने रेस्टॉरंटमधील जेवणाच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो आणि रेस्टॉरंट जेवणाचे दर वाढू शकतात, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. (LPG Cylinder)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.