IPL Retentions : के. एल. राहुलला वगळल्यावर लखनौ सुपरजायंट्सचे संजीव गोयंका झाले ‘असे’ ट्रोल

IPL Retentions : सोशल मीडियावर राहुलला सहानुभूती मिळत आहे 

37
IPL Retentions : के. एल. राहुलला वगळल्यावर लखनौ सुपरजायंट्सचे संजीव गोयंका झाले 'असे' ट्रोल
IPL Retentions : के. एल. राहुलला वगळल्यावर लखनौ सुपरजायंट्सचे संजीव गोयंका झाले 'असे' ट्रोल
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये संघांनी जी स्टार नावं संघातून वगळली किंवा कायम ठेवली नाहीत, त्यातील एक प्रमुख नाव आहे ते के. एल. राहुलचं. लखनौ सुपरजायंट्स संघाचा मागची काही वर्षं तो कर्णधार होता. पण, लखनौने यंदा २१ कोटी रुपये देऊन निकोलस पूरनला कायम ठेवलं. शिवाय रवी बिश्नोई, मयांक यादव आणि आयुष बदोनी यांना कायम ठेवलं. पण, राहुल त्यांच्या पुढील हंगामासाठीच्या रणनीतीत बसत नव्हता. (IPL Retentions)

(हेही वाचा- Godhra Book : हिंदूंना गुन्हेगार ठरवणारा उल्लेख असलेली पाठ्यपुस्तके राजस्थान सरकारने घेतली मागे!)

अर्थात, हे संघ मालक संजीव गोयंका आणि राहुल यांच्यात या हंगामात झालेल्या भांडणानंतर दिसलं होतंच. आताही चार खेळाडू कायम ठेवल्यानंतरचं संजीव गोयंका यांचं विधान गाजतंय. ‘आम्हाला विजयी मानसिकता असलेले खेळाडू संघात हवे आहेत. वैयक्तिक मापदंड आणि कामगिरीच्या पुढे संघाचा विचार करणारे खेळाडू संघात हवेत,’ असं संजीव गोयंका यांनी म्हटलं आहे. पुढे जाऊन ते असंही म्हणतात की, कोणाला ठेवायचं हा निर्णय आमच्यासाठी सोपा होता. ‘अगदी चार मिनिटांत आमचा निर्णय झालेला होता. आम्ही या हंगामातील तीन गोलंदाज आणि पूरन सारखा फलंदाज यांना कायम ठेवलं आहे,’ असं गोयंका म्हणाले. (IPL Retentions)

(हेही वाचा- India vs NZ, 3rd Test : जसप्रीत बुमराह मुंबई कसोटीत का खेळत नाही?)

पण, त्यांच्या बोलण्यात कुठेही के एल राहुलचा विषयही नव्हता. शिवाय वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघ भावनेला प्राधान्य देणारे खेळाडू आम्हाला नकोत, हे वाक्य सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल होत आहेत. ‘२० पैकी १६ खेळाडूंना जाऊ दिल्यावर केलेलं हे विधान आहे,’ अशी प्रतिक्रिया उमटत आहे. (IPL Retentions)

संघ निवड करताना फलंदाजांचा टी-२० आणि त्यातही आयपीएलमधील स्ट्राईकरेट बघितल्याचं बोललं जातंय. झहीर खान आणि जस्टिन लँगर यांनी खेळाडूंचे मागच्या तीन महिन्यातील स्ट्राईकरेट आणि एकूण कामगिरी यांचा आढावा घेतला. यात राहुलने १३८, ११३ आणि १३५ च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत. हीच गोष्ट त्याच्या विरोधात गेल्याचं बोललं जातंय. (IPL Retentions)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.