Virat Kohli : आयपीएलमध्ये विराटच्या नावावर आणखी एक विक्रम 

79
Virat Kohli : विराट कोहली टाकणार राहुल द्रविडला मागे?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये मेगा लिलावापूर्वी किती आणि कोणत्या खेळाडूंना आपल्याकडे ठेवून घेणार हे ठरवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरला संपली आहे. आणि संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आता उघड झाली आहे. एरवी मैदानावर आपल्या बॅटने विक्रम करणाऱ्या विराट कोहलीने इथंही एक विक्रम केला आहे. खेळाडूंना कायम ठेवताना सर्वाधिक रक्कम मोजलेला भारतीय खेळाडू विराट कोहलीच असेल. याशिवाय २० कोटींचा टप्पा पार करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. बंगळुरू संघाने विराटशी २१ कोटींचा करार आधी केला. आणि त्यानंतर सनरायझर्स हैद्राबादने पॅट कमिन्स (२०.५ कोटी) आणि मिचेल स्टार्क (२४.७५) यांनाही २० कोटींच्या वर रक्कम मिळाली. पण, हा टप्पा पार करणारा विराट पहिला ठरला. (Virat Kohli)

(हेही वाचा- महायुतीचं सरकार येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार; Ajit Pawar यांनी व्यक्त केला विश्वास)

‘मला तीन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आलं आहे. आणि त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. माझं आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नातं त्यामुळे आणखी दृढ झालं आहे. आणि या करारादरम्यान हे नातं २० वर्षांचं होईल. एका फ्रँचाईजीसाठी इतकी वर्षं मी खेळू शकेन असं मला वाटलं नव्हतं. पण, हा प्रवास खूप संस्मरणीय आहे,’ असं विराट कोहली म्हणाला आहे. (Virat Kohli)

 विराट बरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) यश दयाल (Yash Dayal) (५ कोटी), रजत पाटीदार (Rajat Patidar) (११ कोटी) या इतर दोन खेळाडूंना आपल्याकडे कायम राखलं आहे. या हंगामात संघाचं नेतृत्व करणारा फाफ दू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना बंगळुरूने सोडचिठ्ठी दिली आहे. फक्त ३ खेळाडूंवर ३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मेगा लिलावासाठी त्यांच्याकडे ८३ कोटी रुपये शिल्लक असतील. या पैशातून ते लिलावात चांगले खेळाडू आपल्याकडे घेऊ शकतील. त्यांचा डोळा लिलावात रिषभ पंतकडे असेल असं दिसतंय. (Virat Kohli)

(हेही वाचा- ICC Test Ranking : जसप्रीत बुमराने गमावलं आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान)

‘२०२५ च्या हंगामासाठी आम्हाला चांगल्या भारतीय खेळाडूंचा भरणा करायचा आहे. या हंगामातील काही अनुभवांमुळे आम्हाला तशी गरज वाटू लागली आहे. काही खेळाडूंवर आमची नजरही आहे. उरलेली तीन राईट टी मॅच कार्ड आम्ही काही खेळाडूंसाठी वापरू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नवीन संघ तयार करण्यावर आता आमचं लक्ष असेल. यश आणि रजत पाटिदार यांच्याकडे आम्ही आशेनं बघतो. शिवाय यश कमी पैशातही मिळून गेला,’ असं रॉयल चॅलेंजर्सचे क्रिकेट संचालक मो बोबाट यांनी म्हटलं आहे. (Virat Kohli)

विराट कोहली बंगळुरू संघाचं २०२५ हंगामात नेतृत्व करणार आहे. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.