अलिबागपासून १२ कि.मी. अंतरावर इतर किनार्याप्रमाणेच निसर्गाचे वरदान घेऊन किहीमचा (Kihim Beach) रम्य किनारा निसर्गप्रेमिकांचे मन रिझवत आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावरील चढी किहीम फाटयावर उतरल्यावर पश्चमेकडे जाणारा रस्ता हा किहीम गावातून समुद्रकिनारी जातो. छायाचित्रणासाठी आपणांस अनेक नैसर्गक सौंदर्यस्थळे या किनार्यावर आढळतील. (Kihim Beach)
(हेही वाचा-Delhi Pollution: दिल्लीत बंदी असतानाही फोडले फटाके; प्रदुषणाचा पारा AQI ४०० पार)
नारळीर्पोफळींची दाट वनश्री आणि आकाशाला गवसणी घालणारी सुरूची झाडे किनार्याची शोभागिुणीत करतात. त्यामुळेच या किनार्यावर पर्यटकांची खूप गर्दी असते. (Kihim Beach)
येथील सृष्टीसौंदर्यात आगळीच भर टाकणारा स्वच्छ नितळ अथांग सागर पर्यटकांना कुठल्याही ऋतुत आग्रहाचे निमंत्रण देत असतो. या समुद्रकिनारी महाराष्ट पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी तंबुंची सोय करण्यात आलेली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात माडांच्या गर्द झाडीत समुद्राच्या कुशीत रहाण्याची मौज काही औरच मात्र ही मौज अनुभवयाची ती फक्त उन्हाळा किंवा हिवाळयातच. (Kihim Beach)
पावसाळयात तंबूत रहाण्याची मजा लुटता येत नाही. परुतु वर्षाचे बाराही महिने किहीम गावात अनेक ठिकाणी घरगुती रहाण्याची तसेच भोजनाची व्यवस्था होते. (Kihim Beach)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community