तळोजा आणि मीरारोडमध्ये दिवाळी साजरी करण्यावरून धर्मांधांनी केलेल्या वादांनंतर आता धारावीत (Dharavi) ही अशीच घटना घडली आहे. धारावीत एका धर्मांधाने आईस्क्रमच्या दुकानाला लावलेल्या लायटींगच्या माळेशी छेडछाड केली. मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली. या व्हिडिओत ९० फीट रोड, धारावी येथील एका आईस्क्रीमच्या दुकानावर लावलेली लाईटची माळ एक धर्मांध खेचून काढताना दिसत आहे. (Dharavi)
( हेही वाचा : Delhi Pollution: दिल्लीत बंदी असतानाही फोडले फटाके; प्रदुषणाचा पारा AQI ४०० पार )
दरम्यान आईस्क्रिम दुकानाचे मालक हरी राम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रात्री दुकानाला टाळा लावून ते घरी गेले. त्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे या भागात दिवाळी साजरी करायची नाही, असा त्यांच्या या कृत्याचा अर्थ आहे. हिंदू सणाला आम्हाला त्रास दिला जातो. मात्र यांच्या सणांना फटाक्यांच्या माळा, लाईटच्या माळांचा काहीच त्रास होत नाही, असे हरी राम म्हणाले. तसेच पोलिस स्टेशनमध्ये संबंधित धर्मांधांविरोधात तक्रार दाखल केल्याचे ही हरी राम म्हणाले. त्याचबरोबर लवकरात लवकर आरोपीला अटक करावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही याबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Dharavi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community