राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभुमीवर महायुतीने कंबर कसली असुन सभा घोषित केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra modi) राज्यातील पहिल्या सभेची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदींचा (PM Narendra modi) महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून विधानसभा निवडणुकांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
पंतप्रधान मोदींच्या चार दिवसात 9 सभा होणार
नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
राज्यात 8 तारखेला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकंच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राला 2 सभा दिल्या आहेत. त्यापैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल, मोदींच्या या दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक होतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. नाशिकच्या ग्राउंडला तर मोदी ग्राउंड नाव दिले आहे, येथे लाखोंची सभा होईल, असेही महाजन यांनी सांगितले. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community