Hardik Pandya : ‘पाच बोटं…पण..’ हार्दिकची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Hardik Pandya : हार्दिक पांड्याला मुंबईने कप्तान पदावर कायम ठेवलं आहे. 

42
Hardik Pandya : ‘पाच बोटं…पण..’ हार्दिकची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ गुण तालिकेत तळाला राहिला. १७ हंगामात फक्त दुसऱ्यांदा इतका खाली राहिला आहे. तरीही मुंबई इंडियन्स प्रशासनाने हार्दिकला (Hardik Pandya) कप्तानपदावरही कायम ठेवलं आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा या पाच खेळाडूंना त्यांनी कायम ठेवलं आहे. त्यासाठी मुंबईने ७५ कोटी रुपये मोजले आहेत. आणि लिलावासाठी त्यांच्याकडे ४५ लाख रुपये शिल्लक राहणार आहेत.

खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी मुंबईने जसप्रीत बुमराहसाठी १८ कोटी रुपये मोजले आहेत. तर सूर्यकुमार आणि हार्दिकला (Hardik Pandya) प्रत्येकी १६.३५ कोटी रुपये मिळणार आहेत. रोहित शर्माला १६.३० कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिलक वर्माला ८ कोटी रुपये मिळणार आहेत. ‘मला मुंबई इंडियन्सकडून कायम प्रेमच मिळालं आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे,’ असं हार्दिकने त्यानंतर बोलून दाखवलं आहे.

(हेही वाचा – Mankhurd-Shivajinagar Constituency : उबाठा-काँग्रेसचे उमेदवारी अर्ज बाद)

‘मुंबई इंडियन्ससाठी खेळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात जे जे चांगलं घडलं ते सगळं मी इथं असतानाच घडलं आहे. माझा क्रिकेटचा प्रवासही इथेच सुरू झाला. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आम्ही मिळून आयपीएल विजेतेपद पटकावलं. इथलं प्रत्येक वर्षं माझ्यासाठी नवीन आठवण आहे. आता २०२५ मध्ये चांगली आठवण तयार करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू,’ असं हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणाला. ‘संघाने कायम ठेवलेले खेळाडू गेली कित्येक वर्षं या संघाबरोबर आहेत आणि त्यांनीच या आठवणी तयार केल्या आहेत. ही भावना खूप छान आहे. पाच बोटांनीच एक मूठ तयार होते. तसं आमचं चाललंय. आम्ही एकमेकांसाठी कायम असेच उभे राहू,’ असंही हार्दिक पांड्या म्हणाला.

हार्दिकसाठी (Hardik Pandya) यंदाचा हंगाम खूपच कठीण होता. बॅटने आणि नेतृत्व करतानाही त्याला यश मिळालं नाही. पूर्ण हंगामात त्याने फक्त २१६ धावा केल्या होत्या आणि षटकामागे १०.७५ धावा लुटल्या होत्या. त्याला फक्त ११ बळी मिळाले. शिवाय कप्तान म्हणूनही त्याची हूर्यो झाली. पण, ते अपयश मागे टाकून पुढील हंगामासाठी सिद्ध होण्याची तयारी मुंबई इंडियन्सनी चालवली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.