हरियाणामधील (Haryana) फरीदाबाद (Faridabad) जिल्ह्यातील सुभाष कॉलेनीतील एका हिंदू कुटुंबियांनी आपल्या राहत्या घराबाहेर ‘हे घर विकाऊ आहे’ अशी पाटी लावली आहे. हिंदू कुटुंबियांचा आरोप आहे की, त्यांची मुले फटाके फोडत असताना मुस्लिम समाजातील काहींनी त्यांच्यावर हल्ला केला. धर्मांधांनी घरात घुसत घरातील महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. महिलांचे कपडे फाडण्यात आले तसेच त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. दरम्यान पीडित कुटुंबियांनी पोलिस प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचा आरोप केला आहे. (Diwali)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत फरीदाबादमधील सुभाष कॉलनीत एक हिंदू मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत फटाके फोडत होता. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या राज आणि आशिक यांच्यासोबत इस्लामिक धर्मांधानी फटाके फोडणाऱ्यांना धमकी देऊ लागले. पीडित कुटुंबियांनी सांगितले की, जेव्हा या प्रकरणी पीडित कुटुंबीय बोलण्यास गेल्यावर त्यांनी पीडित कुटुंबियांमधील महिलांसोबत वाईट कृत्य केले. (Diwali)
( हेही वाचा : Dharavi मध्ये धर्मांधांनी तोडली दिवाळीच्या लाइटींगची माळ; दुकान मालक म्हणतो, आमच्या सणांचा त्यांना त्रास पण…)
कुटुंबियांचा आरोप आहे की, धर्मांधानी यावेळी त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कुटुंबातील महिलांना मारहाण केली. या कुटुंबियातील पीडित तरुणीचे म्हणणे आहे की, धर्मांधांनी त्यांच्यासोबत ही दुशकृत्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच कपडे फाडण्याचे आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करण्यास गेलो, मात्र पोलिसांनी प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. (Diwali)
या हल्ल्याची संपूर्ण माहिती आजूबाजूच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या कॅमेऱ्यात दुर्गाप्रसाद यांच्या घरावर धर्मांध दगडफेक करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच ४० ते ५० हल्लेखोर ही दिसत आहेत. (Diwali)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community