IPL Mega Auction : आयपीएलच्या मेगा लिलावात आता ‘या’ खेळाडूंवर असेल नजर 

IPL Mega Auction : खेळाडू कायम ठेवल्यानंतर आता लक्ष लिलावावर असेल. 

38
IPL Mega Auction : आयपीएलच्या मेगा लिलावात आता 'या' खेळाडूंवर असेल नजर 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमधील दहाच्या दहा संघांनी कोणते खेळाडू राखून ठेवणार याची यादी आता सादर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि के एल राहुल हे या हंगामातील तीन कर्णधार त्यांच्या त्यांच्या संघांनी मुक्त केले आहेत. म्हणजेच हे खेळाडू आता लिलावाच्या फेऱ्यामधून जाणार आहेत. या तिघांबरोबरच आणखी काही स्टार खेळाडू आहेत ज्यांच्यावर इतर संघांच्या उड्या पडणार आहेत. अशा महत्त्वाच्या ५ खेळाडूंवर नजर टाकूया,

१. के एल राहुल – सध्याच्या भारतीय संघाचा तो महत्त्वाचा घटक आहे. शिवाय यष्टीरक्षणही तो करू शकतो आणि आयपीएलमध्ये कप्तानीचा अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे लखनौ संघमालक संजीव गोयंकांबरोबर त्याचं पटलं नसलं तरी इतर संघांच्या त्याच्यावर उड्या पडू शकतात. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – Mankhurd-Shivajinagar Constituency : उबाठा-काँग्रेसचे उमेदवारी अर्ज बाद)

२. रिषभ पंत – रिषभ पंत स्वत: दिल्लीकडे राहण्यास उत्सुक नव्हता असं चित्र या हंगामानंतर होतं. दिल्ली कॅपिटलनेही त्याला मुक्त केलंय. यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न केले आहेत. आता लिलावात ते पुन्हा एकदा तसा प्रयत्न करतील. तडाखेबाज फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणूनही तो टी-२० साठी अगदी योग्य खेळाडू आहे.

३. इशान किशन – इशान किशन इतकी वर्षं मुंबई इंडियन्सकडे होता. आयपीएलमध्ये तो एक ताकद म्हणून ओळखला जातो. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही चांगला अनुभव आहे. त्याच्या जोरावर तो संघ मालकांना आपल्याकडे आकर्षित करणार हे नक्की. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – अकरा वर्षाच्या पीडित मुलीला Mumbai High Court चा दिलासा; गर्भपात करण्यास दिली परवानगी )

४. श्रेयस अय्यर – श्रेयस अय्यर हा सध्याचा आयपीएल चषक उंचावलेला कर्णधार आहे. अलीकडे मुंबईसाठी खेळताना त्याचा फॉर्म हरवलेला दिसला आणि तंदुरुस्तीच्या बाबतीतही तो धडपडतोय. त्यामुळेच कोलकाता संघाने त्याला मुक्त केलं असावं. पण, तंदुरुस्त असेल तर श्रेयस अनुभवी आणि कुठल्याही संघाला हवा असा फलंदाज आहे.

५. अर्शदीप सिंग – डावखुरा तेज गोलंदाज हेच अर्शदीपचं वैशिष्ट्य आहे आणि भारतीय टी-२० संघात तो सध्या नियमित खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे पंजाब संघाने त्याला नियमित केलं नसलं, तरी लिलावात त्याच्यावर उड्या पडतील हे नक्की आहे. (IPL Mega Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.