UBT च्या तक्रारीची निवडणुक आयोगाने घेतली दखल

140
UBT च्या तक्रारीची निवडणुक आयोगाने घेतली दखल
UBT च्या तक्रारीची निवडणुक आयोगाने घेतली दखल

शिवसेना उबाठा (UBT)गटातर्फे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना दि. ३१ ऑक्टोबर एक पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर येथील दीपोत्सवाची तक्रार करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे (MNS) आयोजित दीपोत्सवामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार उबाठा (UBT)गटाने केली होती. तसेच या दीपोत्सवाचा संपूर्ण खर्च येथील स्थानिक माहीम विधानसभेचे मनसे उमेदवार अमित ठाकरेंच्या निवडणुक खर्चात समाविष्ट करण्याची मागणी उबाठा गटाने केली आहे. (UBT)

( हेही वाचा : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या खासदार Arvind Sawant यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) (UBT) पक्षाला ह्या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. मुळात आचारसंहिता सुरु असताना मनसेने दीपोत्सवात मनसेच्या नावाने कंदील आणि प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात सर्वत्र रोषणाई करण्यात आली होती. (UBT)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.