Shambhuraj Desai यांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, चुकीची चिठ्ठी…

126

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, बेलात वक्तव्य करणारे उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिवसेनेचे नेते आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राऊतांना टोला लगावला आहे.  (Shambhuraj Desai)

संजय राऊत काय म्हणाले ?

राज्यात मनसेच्या मदतीने महायुतीचे सरकार येईल, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावर, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 50 जागाही मिळत नाहीत. कारण जर मनसेच्या मदतीने सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नसेल, तर 150 जागा यांना मिळतील (मनसे) आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील. खरेतर मुख्यमंत्रीही त्यांचाच (मनसे) व्हायला हवा हो मग…, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. 

(हेही वाचा – Diwali साजरी करणाऱ्या तरुणीचा धर्मांधांकडून विनयभंग; हिंदू कुटुंबाच्या घरावर दगडफेक)

शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार तथा नेते संजय राऊत यांना प्रतिक्रिया दिली. यात देसाई म्हणाले,    “मी मागेही बोललो होतो, चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट. त्या पोपटाची आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी निघालेली नाही. ज्योतिषी पिंजऱ्यात पोपट घेऊन बसतो आणि एकदा, दोनदा, तिनदा गेल्यानंतर आपण म्हणतो की या पोपटाकडून चुकीचीच चिठ्ठी निघते. यानंतर आपण पोपटवाला बदलतो आणि दुसऱ्या पोपटवाल्याकडे जातो, चिठ्ठी खरी निघते का, हे बघण्यासाठी. तसेच हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे. आजपर्यंत संजय राऊत जे काही बोलले आहेत, ते कधीही खरे झालेले नाही. ते हवेत बोलत असतात, यामुळे त्यांच्या विधानाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता नाही.” असे विधान शंभूराज देसाई यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.