Assembly Election 2024 : बाजारपेठांमध्ये निवडणुकीचे साहित्य खरेदी करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

332
Assembly Election 2024 : बाजारपेठांमध्ये निवडणुकीचे साहित्य खरेदी करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
Assembly Election 2024 : बाजारपेठांमध्ये निवडणुकीचे साहित्य खरेदी करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोमात आहेत. येत्या ५ नोव्हेंबरपासून मुंबईसह कोकण आणि इतर विविध ठिकाणी प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्‍यक्ष प्रचाराची पूर्वतयारी सुरू केली आहे. प्रचाराचे साहित्‍य खरेदी करण्यासाठी मुंबई येथील दादर, लालबागच्या (Dadar, lalbaug Market) बाजारात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.  (Assembly Election 2024)

दिवाळी संपल्‍यानंतर साहित्य (election campaign) खरेदी करण्यासाठी बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा प्रचार साहित्य विक्रेत्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. तर भाजपा, काँग्रेसपेक्षा मनसेने प्रचार साहित्य खरेदी करण्यावर जोर दिल्‍याचे काही विक्रेत्‍यांनी सांगितले. प्रचार साहित्याचा सर्वांत मोठा बाजार हे मुंबईतील दादर आणि लालबाग येथील बाजाराची ओळख आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजपा, मनसे आणि इतर पक्षांची चिन्हे असलेल्या टी- शर्ट, टोपी, बिल्‍ले, दुपट्टा, झेंडे आणि इतर प्रचार साहित्याची निवडणूक काळात मोठी मागणी असते.

उमेदवारी अर्ज भरल्‍यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी यंदा प्रचार साहित्य विक्रेत्यांनी  नवनवीन आकर्षक डिझाइनच्या पक्षांच्या निशाण्या असलेल्या कापडी बॅग, मोबाईल पाऊच, पर्स, मेटलची कि चेन, कागदी पताका, मेटल बॅच, कॉर्पोरेट बॅग, राजकीय पक्षांचे छोटे कटआऊट, कापडी झेंडे, टी-शर्ट, साड्या, मफलर, फेटे बाजारात विक्रीसाठी सज्ज ठेवले आहेत. 

(हेही वाचा – Hardik Pandya : ‘पाच बोटं…पण..’ हार्दिकची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत)

पक्षफुटीचा परिणाम साहित्य विक्रीवर  

पक्षफुटीचा परिणाम साहित्‍य विक्रेत्‍यांच्या व्यवसायावरही झाला आहे. शिवसेनेमध्ये (Shivsena) दोन गट पडले आहेत, मात्र जुन्या प्रचार साहित्यांमध्ये टी-शर्ट, दुपट्टा व इतर प्रचार साहित्यांवर धनुष्‍यबाण आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. त्यामुळे जूने प्रचार साहित्य वापरता येणार नाही, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येसुद्धा दोन गट पडले आहेत. त्यामुळे जुन्या प्रचार साहित्यांमध्ये शिवसेनेसारखा घोळ झाला आहे. त्यामुळे प्रचार साहित्यांचे नुकसान झाले आहे. असे मत निवडणूक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्‍यांनी संगितले.  

(हेही वाचा – Assembly Election मध्ये ४७ जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा गट भिडणार)

मात्र अपक्ष उमेदवारांचे जोपर्यंत चिन्ह वाटप केले जात नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून प्रचार साहित्याची मागणी होत नाही. चिन्हांचे वाटप झाल्‍यानंतर प्रचार साहित्याला मोठी मागणी वाढेल, असे येथील विक्रेत्‍यांनी सांगितले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.