Ind vs NZ, 3rd Test : शेवटच्या ५ मिनिटांत भारतीय संघाने कशी केली हाराकिरी; जयसवाल आणि कोहलीही बाद 

Ind vs NZ, 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या दिवशी १ बाद ७८ वरून भारतीय संघ ४ बाद ८६ वर पोहोचला 

123
Ind vs NZ, 3rd Test : शेवटच्या ५ मिनिटांत भारतीय संघाने कशी केली हाराकिरी; जयसवाल आणि कोहलीही बाद 
Ind vs NZ, 3rd Test : शेवटच्या ५ मिनिटांत भारतीय संघाने कशी केली हाराकिरी; जयसवाल आणि कोहलीही बाद 
  • ऋजुता लुकतुके 

साधारणपणे कसोटी सामन्यात दिवसाची शेवटची २ षटकं राहिली असताना खेळाडू ती शांतपणे खेळून काढणंच पसंत करतात. तसाच संकेत आहे. पुढील नव्या दिवसाची मनातल्या मनात तयारीही सुरू झालेली असते. पण, भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्या मुंबई कसोटीत भारतीय संघाने शेवटच्या दोन षटकांत हकनाक ३ गडी गमावले. संघाची अवस्था १ बाद ७८ वरून थेट ४ बाद ८६ अशी झाली. महत्त्वाचं म्हणजे यात यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली हे मोलाचे दोन गडीही आहेत. (Ind vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठरलं तर! पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ‘या’ दिवशी होणार)

दिवसाला कलाटणी मिळाती भारताच्या डावाच्या १८व्या षटकात. सुरुवातीला यशस्वी जयस्वाल चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्यानंतर आलेला मोहम्मद सिराज पुढच्याच चेंडूवर पायचित झाला. त्यात भर म्हणून की काय सिराजने एक रिव्ह्यूही घालवला. (Ind vs NZ, 3rd Test)

त्याच्या पुढच्याच षटकात अनुभवी विराट कोहलीने आधी एक चौकार ठोकला. त्यानंतरच्या चेंडूवर नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावचीत झाला. मॅट हेन्रीचा थ्रो अचूक यष्टीवर बसला. (Ind vs NZ, 3rd Test)

 फक्त ८ चेंडूंमध्ये भारतीय संघाने पहिल्या दिवसावर तोपर्यंत असलेलं वर्चस्व धुळीला मिळवलं.

भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनं केली होती. रोहित शर्मा चांगली सुरुवात करुन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मानं १८ धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं भारताचा डाव सावरला. यशस्वी आणि शुभमन या दोघांनी ५३ धावांची भागिदारी केली. १८व्या षटकात एजाझ पटेल गोलंदाजीला आला. त्याने कर्णधाराने सोपवलेली मोहीम फत्ते केली. यशस्वी जयस्वालला त्यानं ३० धावांवर बाद केलं. त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून मोहम्मद सिराजला पाठवण्यात आलं. मात्र तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.  यानंतर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मैदानावर आला. मात्र, तो मॅट हेन्रीच्या अचूक फेकीवर बाद झाला. यामुळे भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ गडी गमावून ८६ धावा केल्या आहेत. (Ind vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा- उत्तर प्रदेशात सरकारी जमिनीवर बांधली Masjid )

भारताचा डाव रोहित शर्मा बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी सावरला होता. मात्र, न्यूझीलंडनं शेवटच्या दोन षटकांत तीन बळी घेत पलटवार केला.  (Ind vs NZ, 3rd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.